AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत 18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या तिन्ही भूमिकांमध्ये अपयशी ठरला.

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?
Axar Patel And Rishabh Pant DC vs LSG Ipl 2025Image Credit source: PTI
| Updated on: Mar 25, 2025 | 4:00 PM
Share

ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सुरुवात अपेक्षित झाली नाही. लखनौला सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सकडून रंगतदार सामन्यात 1 विकेटने पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात ऋषभ पंत अपयशी ठरला. पंत या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे. मात्र पंत कर्णधार आणि फलंदाज म्हणून आपल्या भूमिकेला न्याय देऊ शकला नाही. पंतने बॅटिंगने निराशा केली. पंतला भोपळाही फोडता आला नाही. तसेच पंतने विकेटकीपर म्हणूनही काही चुका केल्या, ज्या लखनौच्या पराभवास कारणीभूत ठरल्या, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.

पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई

लखनौ पंतवर मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2025 Mega Auction) विक्रमी बोली लावली. लखनौने पंतला 27 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र पंतला या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र त्यानंतरही पंतची जवळपास 2 कोटींची कमाई झाली. आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळते. त्यानुसार प्रत्येक सामन्यानुसार पाहिलं तर पंतला एका सामन्याचं जवळपास 2 कोटी मानधन आहे. त्यानुसार पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई झाली, असं म्हटलं जातंय. पंत दिल्लीविरुद्ध 6 चेंडूंचा सामना केला आणि भोपळा न फोडताच माघारी परतला.

पंतमुळे लखनौचा पराभव?

पतंने बॅट्समॅन आणि कर्णधार म्हणून चुका केल्या. तसेच पंत विकेटकीपर म्हणूनही अपयशी ठरला. पंतने दिल्लीच्या डावातील 15 व्या ओव्हरदरम्यान शाहबाज अहमदच्या बॉलवर आशुतोष शर्मा याचा कॅच सोडला. याच आशुतोष शर्माने (इमपॅक्ट प्लेअर) सामना फिरवला आणि दिल्लीला विजयी केलं. पंतने हा कॅच घेतला असता तर निश्चित सामन्याचा निकाला वेगळा लागला असता. इतकंच नाही, पंतने दिल्लीच्या 20 व्या ओव्हरमध्ये स्टंपिंगची संधी सोडली. पंतने मोहित शर्मा याला स्टंपिंग करण्याची संधी गमावली. पंतने मोहितला स्टंपिंग केलं असतं तर लखनौचा विजय झाला असता, कारण त्यांनी आधीच 9 विकेट्स गमावल्या होत्या.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.