DC vs SRH IPL 2022: पॉवेलच्या 9 चेंडूत 48 धावा, वॉर्नरचे 12 फोर, 3 SIX चुकवू नका, पावर हिटिंगचा शो एका क्लिकवर पहा

| Updated on: May 05, 2022 | 9:55 PM

DC vs SRH IPL 2022: डेविड वॉर्नरने 58 चेंडूत नाबाद 92 धावा फटकावल्या. यात 12 फोर आणि 3 सिक्स आहेत. वॉर्नरचा खेळ पाहून तो हैदराबादला त्यांच्या चुकांची जाणीव करुन देत होता, असंच वाटलं.

DC vs SRH IPL 2022: पॉवेलच्या 9 चेंडूत 48 धावा, वॉर्नरचे 12 फोर, 3 SIX चुकवू नका, पावर हिटिंगचा शो एका क्लिकवर पहा
Rovman powell-David warner
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: रोव्हमॅन पॉवेल (Rovman Powell) आणि डेविड वॉर्नर (David Warner) या दोघांनी आज तुफान बॅटिंग केली. डेविड वॉर्नरने तर सनरायजर्स हैदराबाद (SRH) बरोबरचा आपला जुना हिशोब चुकता केला. वॉर्नरच्या बॅटिंगमध्ये आज एक निश्चय दिसला. वॉर्नर आधी सनरायजर्स हैदराबादकडून खेळायचा. तो त्या संघाचा कॅप्टन होता. पण SRH ने त्याला कॅप्टनशिपवरुन हटवलं होतं. त्यानंतर वॉर्नरने SRH च्या फ्रेंचायजीबरोबर सोशल मीडियावर पंगे घेतले होते. आज वॉर्नरने आपल्या बॅटिंगने तो सर्व हिशोब चुकता केला. त्याने एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. दुसऱ्याबाजूने रोव्हमॅन पॉवेलनेही कॅरेबियन हिटिंग शो दाखवला. रोव्हमॅन पॉवेल फलंदाजी करताना फोर-सिक्स एवढाच खेळ सुरु होता. पॉवेलने आज त्याच्या फलंदाजीची ताकत दाखवून दिली. वॉर्नर-पॉवेल जोडीने SRH च्या गोलंदाजांचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला. त्या वादळापुढे हैदराबादच्या एकही गोलंदाजाचा निभाव लागला नाही. दिल्लीने निर्धारित 20 षटकात तीन बाद 207 धावा केल्या.

वॉर्नरचे 12 फोर आणि 3 सिक्स

डेविड वॉर्नरने 58 चेंडूत नाबाद 92 धावा फटकावल्या. यात 12 फोर आणि 3 सिक्स आहेत. वॉर्नरचा खेळ पाहून तो हैदराबादला त्यांच्या चुकांची जाणीव करुन देत होता, असंच वाटलं. मागच्या आठ डावातलं वॉर्नरचं हे चौथ अर्धशतक आहे. आज त्याने चौथ अर्धशतक पूर्ण केलं. या सीजनमध्ये दिल्लीकडून वॉर्नरनेच 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

डेविड वॉर्नरने सनरायजर्स हैदराबाद बरोबर जुना हिशोब चुकवला, क्लिक करुन 12 फोर, 3 SIX पहा

रोव्हमॅन पॉवेलचा रुद्रावतार

रोव्हमॅन पॉवेलने तर आज रुद्रावतार धारण केला होता. उमरान मलिक सारख्या वेगवान गोलंदाजाचाही त्याने चोप काढला. 35 चेंडूत 67 धावांची तुफान खेळी तो खेळून गेला. यामध्ये तीन चौकार आणि सहा षटकार आहेत.

रोव्हमॅन पॉवेलची पैसा वसूल बॅटिंग इथे क्लिक करुन पहा

म्हणजे चौकार-षटकार मिळवले, तर एक प्रकारे 9 चेंडूत त्याने 48 धावा फटकावल्या. त्याच्या फलंदाजीने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच खूप मनोरंजन झालं.


पॉवेलची बॅटिंग पाहून पैसा वसूल मॅच अशीच प्रतिक्रिया कोणाच्याही तोंडून निघेल. रोव्हमॅन पॉवेलने संघासाठी आज एक महत्त्वाचा रोल निभावला. प्लेऑफचा आश्वासक प्रवास सुरु ठेवण्यासाठी दिल्लीला आज 2 पॉइंट मिळवणं आवश्यक आहे.