DC vs SRH Prediction Playing XI IPL 2022: दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी हैदराबादला झटका, प्लेइंग-11 निवडणं डोकेदुखी?

| Updated on: May 05, 2022 | 8:51 AM

DC vs SRH Prediction Playing XI IPL 2022: दिल्ली आणि SRH चे आतापर्यंत समान सामने झाले आहेत. सनरायजर्सने पाच सामन्यात विजय मिळवला आहे, चार मॅचमध्ये ते पराभूत झालेत.

DC vs SRH Prediction Playing XI IPL 2022: दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी हैदराबादला झटका, प्लेइंग-11 निवडणं डोकेदुखी?
srh vs dc
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) संघ विशेष प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सातत्य दिसत नाही. एक-दोन खेळाडू सोडल्यास कोणीही विशेष प्रभावित केलेलं नाही. त्यामुळे दिल्लीचा प्लेऑफचा (Play off)  मार्ग खडतर दिसतोय. दिल्लीला अजून पाच सामने खेळायचे आहेत. त्यांना दमदार प्रदर्शन करुन विजय मिळवावा लागेल. दिल्लीच्या ऋभष पंतचा (Rishabh pant) गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात हैदराबादपेक्षा दिल्लीला विजय आवश्यक आहे.

दिल्ली आणि SRH चे आतापर्यंत समान सामने झाले आहेत. सनरायजर्सने पाच सामन्यात विजय मिळवला आहे, चार मॅचमध्ये ते पराभूत झालेत. तेच दिल्लीने चार सामने जिंकलेत. पाच सामन्यात त्यांचा पराभव झालाय. सनरायजर्सची टीम 10 पॉइंटससह चौथ्या तर दिल्ली 8 पॉइंटससह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दिल्लीला आज काहीही करुन जिंकावच लागेल. पराभवामुळे दिल्लीची पुढच्याफेरीत पोहोचण्याची समीकरणं बिघडू शकतात.

दिल्लीच्या टीममध्ये दोन बदल?

दिल्लीकडून डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्या कामगिरीत सातत्य दिसलं आहे. सनरायजर्स विरुद्धच्या सामन्यात या जोडीकडून जास्त अपेक्षा असतील. पंत फलंदाजीत बदल करणार नाही. पण गोलंदाजीत बदल पहायला मिळू शकतो. खलील अहमदच्या दुखापतीबद्दल स्थिती स्पष्ट नाहीय. पण तो फिट झाल्यास चेतन साकरियाची जागा घेऊ शकतो. एनरिक नॉर्खियाच्याही फिटनेसबद्दल स्थिती स्पष्ट नाहीय. तो फिट झाल्यास मुस्ताफिजुर रहमानच्या जागी खेळू शकतो.

सनराजयर्सच्या टीममध्ये एक बदल निश्चित

हैदराबादच्या संघात एक बदल निश्चित आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली आहे. जे सुचितला त्याच्याजागी संधी मिळू शकते. अन्य बदल होण्याची शक्यता कमी आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी बरोबर फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे त्याची दुखापत हा हैदराबाद संघासाठी एक मोठा झटका आहे. वेगवान गोलंदाज दमदार कामगिरी करत आहेत. अभिषेक शर्मा सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एडन मार्कराम, निकोलस पूरन आणि केन विलियमसन सातत्याने धावा करत आहेत.

खेळाडूला दुखापत SRH च्या टीममध्ये नवीन गोलंदाज

मध्यमगती गोलंदाज सौरभ दुबेच्या जागी सनरायजर्स हैदराबादने सुशांत मिश्राला करारबद्ध केलं आहे. पाठिच्या दुखापतीमुळे सौरभ दुबेला आयपीएलचा उर्वरित सीजन खेळता येणार नाहीय. सौरभ दुबेच्या जागी संघात आलेला सुशांत मिश्रा रांचीचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे. प्रथम श्रेणीच्या चार सामन्यात त्याने 13 विकेट काढल्या आहेत. अवघ्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये तो SRH कडून खेळणार आहे.

अशी आहे दोन्ही टीम्सची संभाव्य Playing- 11

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कॅप्टन), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान/एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया/खलील अहमद

सनरायजर्स हैदराबाद – केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, जे सुचित, शशांक सिंह, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक,