AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : दीपक चहरने गिटार वाजवत गायलं सुरेख गाणं, टीम सदस्यानेही दिली साथ

भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पहिल्या दोन सामन्यात मात देत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा ठरला तो दिपक चहारचा...

VIDEO : दीपक चहरने गिटार वाजवत गायलं सुरेख गाणं, टीम सदस्यानेही दिली साथ
दीपक चहर
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 11:08 AM
Share

मुंबई : भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरने (Deepak Chahar) भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. उत्कृष्ठ खेळी खेळणाऱ्या दीपकवर या सामन्यात किती तणाव होता हे त्याला मैदानात येणाऱ्या घामावरुनच कळत होते. अखेरच्या काही षटकांत गर्मीमुळे दीपकची हालत खराब झाल्याची दिसून येत होतं. त्यामुळे या तणावपूर्ण सामन्यानंतर विश्रांतीच्या वेळेत विरंगुळा म्हणून दिपकने गिटार हातात घेऊन जुनी हिंदी गाणं पसंत केलं आहे.

व्हिडीओमध्ये दीपक हातात गिटार घेऊन ते वाजवत जुनी हिंदी गाणी गात आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो संघाचा फिजीयो असणाऱ्या निरंजन पंडीत याने देखील दीपकला गाणं गाण्यात साथ दिली आहे. दीपकचा हा व्हीडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.

दीपकची रोमहर्षक खेळी

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे सलामीवीर काही वेळातच तंबूत परतले. एकट्या सूर्यकुमार यादवने 53 धावा ठोकत एकाकी झुंज दिली मात्र तोही बाद झाल्यावर भारताच्या विजयाची आशाही मावळताना दिसत होती. त्यावेळी सातव्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या दीपक चहाकरने सामन्याची सूत्र हाती घेतली. सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली. दोघांनी मिळून भारताला अप्रतिम विजय मिळवून दिला.

हे ही वाचा :

IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग

दीपक चहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली