Deepak chahar Wedding: ‘मी तुला शब्द देतो की…’ लग्नानंतर दीपक चाहरची इन्स्टाग्रामवर बायकोसाठी खास पोस्ट

Deepak chahar Wedding: बुधवारी रात्री दीपक आणि जयाने सात फेरे घेतले. दीपक चाहरच्या लग्नाला भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटू येतील, अशी चर्चा होती.

Deepak chahar Wedding: मी तुला शब्द देतो की... लग्नानंतर दीपक चाहरची इन्स्टाग्रामवर बायकोसाठी खास पोस्ट
Deepak chahar Wedding
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 02, 2022 | 8:49 AM

मुंबई: भारताचा आणखी एक प्रसिद्ध क्रिकेटपटू काल विवाहाच्या बोहल्यावर चढला. त्याचं नाव आहे (Deepak chahar) दीपक चाहर. गर्लफ्रेंड जया भारद्वाज (Jaya bhardwaj) आता त्याची आयुष्यभरासाठी जोडीदार बनली आहे. काल एक जूनच्या रात्री दोघे कुटुंबीय, मित्र परिवाराच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले. मंगळवारीच दीपक चाहरच्या लग्नाचे विधी (Deepak chahar Wedding) सुरु झाले होते. दोघे आयुष्यभरासाठी लग्नाच्या पवित्र नात्यात बांधले गेले आहेत. लग्नानंतर दीपक चाहरच्या चाहत्यांना त्याच्या सोशल मीडियावरील पहिल्या पोस्टची प्रतिक्षा होती. लग्नानंतर काही तासातच दीपक चाहरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन चाहत्यांची उत्सुक्ता संपवली. फक्त दीपक चाहरच नाही, त्याची पत्नी जया भारद्वाजनेही इन्स्टाग्रामवर रोमँटिक पोस्ट शेयर केली आहे. दीपक चाहर आणि जया भारद्वारे आग्र्यात विवाहबद्ध झाले. दोन दिवसांपासून आग्र्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नाचे विधी सुरु होते.

लग्नाला एका क्रिकेटपटूची उपस्थिती

बुधवारी रात्री दीपक आणि जयाने सात फेरे घेतले. दीपक चाहरच्या लग्नाला भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटू येतील, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात असं काही घडलं नाही. दीपक चाहरचा छोटा भाऊ ऑलराऊंडर राहुल चाहर लग्नाला उपस्थित होता. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये राहुल पंजाब किंग्सकडून खेळला.

पत्नी जयासाठी खास पोस्ट

लग्नानंतर काही तासाच दीपक चाहरने इन्स्टाग्रामवर पत्नी जयासाठी खास पोस्ट केली. “जेव्हा मी पहिल्यांदा तुला भेटलो, त्याचवेळी मला जाणवलं होतं की, तू फक्त माझ्याासठी बनली आहेस. प्रत्येक क्षण आपण एकत्र जगलो आहोत. आता आयुष्यभर एकत्र राहू. मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन, हा माझा तुला शब्द आहे” असं दीपकने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलय. ‘हा आमच्या आय़ुष्यातीस सुंदर क्षण असून आम्हाला आशिर्वाद द्या’ असंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

त्याने माझं ह्दय चोरलं, त्यामुळे मी…

जया भारद्वाजनेही लग्नानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. त्यात तिने म्हलय की, “त्याने माझं ह्दय चोरलं, त्यामुळे मी त्याचं आडनाव’. दीपक चाहर आणि जया भारद्वाज दोघेही लग्नाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होते. मनीष मल्होत्राने त्यांच्यासाठी हा ड्रेस डिझाईन केला होता. दीपक चाहरने सफेद रंगाचा शेरवानी परिधान केला होता. नववधू जया लाल आणि गोल्डन रंगाच्या लेंहग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. दीपक चाहर गुणी क्रिकेटपटू आहे. दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकला नाही. हॅमस्ट्रिंग, पाठिच्या दुखण्याच्या समस्येचा तो सामना करतोय.