The Hundred Auction: ऋचा घोषसाठी मोजले इतके सारे पैसे, दीप्ती शर्मावर लागली पहिली बोली

Indians in The Hundred auction: इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या वुमन्स हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेचा लिलाव पार पडला. या लिलावात दीप्ती शर्मा बोली लागलेली पहिली भारतीय खेळाडू ठरली. तर ऋचा घोषवरही मोठी बोली लागली.

The Hundred Auction: ऋचा घोषसाठी मोजले इतके सारे पैसे, दीप्ती शर्मावर लागली पहिली बोली
The Hundred Auction: संजीव गोयंकाने ऋचासाठी मोजले इतके सारे पैसे, दीप्ती शर्मावर लागली पहिली बोली
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 11, 2026 | 7:30 PM

The Hundred 2026: इंग्लंडमध्ये वुमन्स क्रिकेट लीग अर्थात द हंड्रेड लीग स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंचाही समावेश होता. द हंड्रेड 2026 च्या लिलावात एकूण 17 भारतीय खेळाडू खेळण्यासाठी रिंगणात होते. त्यापैकी सहा खेळाडू गेल्या वर्षीच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. या स्पर्धेच्या नव्या पर्वापूर्वीच्या लिलावात दीप्ती शर्मा ही बोली लागलेली पहिली भारतीय खेळाडू ठरली. दीप्ती शर्माला द हंड्रेड लीग स्पर्धेत काव्या मारनची फ्रेंचायझी असलेल्या सनरायझर्स लीड्सने विकत घेतलं. काव्या मारनच्या फ्रेंचायझीने 34 लाखांच्या बेस प्राईसवर दीप्ती शर्माला घेतलं. दीप्ति शर्माची ही दुसरी फ्रेंचायझी आहे. यापूर्वी द हंड्रेडच्या मागच्या दोन पर्वात लंडन स्पिरीटकडून खेळली होती. दुसरीकडे, दीप्ति शर्माच्या तुलनेत ऋचा घोष सर्वाधिक भाव खाऊन गेली. तिच्यासाठी संजीव गोयंका यांची फ्रेंचायझी असलेल्या मॅन्चेस्टर सुपर जायंट्सने 61 लाखांची बोली लावली. म्हणजेच द हंड्रेड 2026 मध्ये ऋचा घोष, स्मृति मंधाना आणि मेग लेनिंगसारख्या खेळाडूंसोबत खेळताना दिसणार आहे.

द हंड्रेड वुमन्स लीग स्पर्धेत स्मृती मंधाना या आधीच मॅन्चेस्टर सुपर जायंट्स संघात होती. पण मागच्या पर्वात खेळू शकली नव्हती. पण यंदाच्या पर्वात खेळण्यासाठी सज्ज आहे. स्मृती मंधाना व्यतिरिक्त मॅन्चेस्टर सुपर जायंट्स संघात सोफी एक्लेस्टोन आहे. स्मृती मंधानासारखाच जेमिमा रॉड्रिग्सचा द हंड्रेड फ्रेंचायझीसोबत करार झाला आहे.

यास्तिका भाटिया आणि फिरकीपटू श्रीचराणी यांना कोणीही भाव दिला नाही. दोन्ही खेळाडू लिलावात अनसोल्ड राहिले. 17 खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, श्री चरणी, पूजा वस्त्राकर, काश्वी गौतम, शिखा पांडे, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, नंदनी शर्मा, आशा शोभना आणि राधा यांचा समावेश होता.

Follow Us