आरसीबीने डावलल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने फाफ डु प्लेसिसला दिली मोठी जबाबदारी, पण झालं असं की…

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी सर्वच कर्णधारांची घोषणा झाली असून दिल्ली कॅपिटल्सने आणखी एक डाव टाकला आहे. कर्णधारपदासाठी एक दोन चेहरे असताना अक्षर पटेलकरडे जबाबदारी सोपवली. आता उकर्णधाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

आरसीबीने डावलल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने फाफ डु प्लेसिसला दिली मोठी जबाबदारी, पण झालं असं की...
फाफ डु प्लेसिस
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 17, 2025 | 4:54 PM

आयपीएल 2025 स्पर्धा आता तोंडावर आली असून पहिल्या दोन आठवड्यातच संघांचं रंगरूप कळणार आहे. कोणता संघ फॉर्मात असेल आणि पुढपर्यंत जाईल याचा अंदाज येईल. या पर्वात पाच नवीन कर्णधार क्रीडारसिकांना पाहायला मिळणार आहेत. केएल राहुलने कर्णधारपदासाठी नकार दिल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने ही धुरा अक्षर पटेलच्या खांद्यावर टाकली. अक्षर पटेलकडे फक्त एकाच सामन्यात कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने आणखी एक डाव टाकला आहे. अक्षर पटेलला पाठिंबा मिळावा यासाठी उपकर्णधारपदाची घोषणा केली आहे. मागच्या पर्वात आरसीबीचं कर्णधारपद भूषवलेल्या फाफ डु प्लेसिसच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा टाकली आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा अक्षर पटेलला होणार आहे. दुसरीकडे, अक्षर पटेल काही कारणास्तव एखाद दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही तर कर्णधारपदाची धुरा फाफकडे येईल यात काही शंका नाही. दुसरीकडे, फाफला उपकर्णधारपद दिल्याने तो प्लेइंग 11 चा भाग राहणार आहे.

खरं तर कर्णधारपदावरून थेट उपकर्णधारपदावर फाफ डु प्लेसिसची नियुक्ती होणं म्हणजे एकप्रकारे डिमोशनच म्हणावं लागेल. इतकंच काय तर मागच्या पर्वाच्या तुलनेत फाफच्या कमाईतही कपात झाली आहे. या पर्वात त्याला 5 कोटी रुपये कमी मिळणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मागच्या पर्वात फाफला 7 कोटी रुपये दिले होते. मात्र यावेळी मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. म्हणजेच फाफ डु प्लेसिसला डिमोशनसह पैशांचं नुकसान झालं आहे.

फाफ डु प्लेसिस 2012 पासून आयपीएल स्पर्धेत खेोळत आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबत त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आतापर्यंत 145 आयपीएल सामने खेोळाला असून 35.99 च्या सरासरीने 4571 धावा केल्या आहेत. यात 37 अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या पर्वातील 15 सामन्यात 29.20 च्या सरासरीने 438 धावा केल्या. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स एकदाही जेतेपद जिंकू शकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी राहते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.