DC vs CSK Live Streaming : दिल्ली-चेन्नईत कडवी झुंज, कोण जिंकणार पाचवा सामना?
Delhi Capitals vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard: दिल्ली कॅपिट्ल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात क्रिकेट चाहत्यांना 5 एप्रिलला 2 संघांत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील 48 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. दोन्ही संघांची या मोसमात आतापर्यंत सारखीच कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघांचा हा नववा सामना असणार आहे. त्याआधी चेन्नईने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीनेही 8 सामने खेळल्यानंतर 4 वेळा विजय मिळवला आहे.
चेन्नई आणि दिल्लीची सारखीच स्थिती असल्याने दोन्ही संघांत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. उभयसंघात 2 गुणांसाठी चढाओढ असणार आहे. या निमित्ताने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मंगळवारी 5 मे रोजी होणार आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली इथे होणार आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
दिल्ली-चेन्नई दुसऱ्यांदा आमनेसामने
दिल्ली आणि चेन्नई या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी चेन्नईने 11 एप्रिलला दिल्लीवर विजय मिळवला होता. चेन्नईने दिल्लीचा 23 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता दिल्ली या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.