4 मॅच 4 सेंच्युरी, गोलंदाजांचा काळ बनला टीम इंडियाचा ‘हा’ फलंदाज
क्रिकेट चाहते अजूनही विराट कोहलीच्या या शतकाच्या आनंदातून बाहेर आलेले नाहीत. या विराट शतकासमोर अन्य शतकांची फारशी चर्चा न होणं, स्वाभाविक आहे.

मुंबई: जागतिक क्रिकेटमध्ये सध्या फक्त एका इनिंगची चर्चा आहे, ते म्हणजे विराट कोहलीचं शतक. जवळपास तीन वर्षानंतर विराट कोहलीने शतक झळकावलं. करीयरमधलं विराट कोहलीच हे 71 वं शतक आहे. क्रिकेट चाहते अजूनही विराट कोहलीच्या या शतकाच्या आनंदातून बाहेर आलेले नाहीत. या विराट शतकासमोर अन्य शतकांची फारशी चर्चा न होणं, स्वाभाविक आहे. अन्य भारतीय फलंदाजही तीन आकडी धावसंख्येपर्यंत पोहोचतायत. यश ढुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
जबरदस्त इनिंग खेळून गेला
टीम इंडियाचा उदयोन्मुख खेळाडू यश ढुलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. रणजी करंडक स्पर्धेत यश ढुलने जबरदस्त सुरुवात केली. आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही यशचा तोच फॉर्म कायम आहे. यश दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ झोनकडून खेळतोय. ईस्ट झोन विरोधात पहिल्याडावात तो सलामीला आला होता. यश यावेळी 193 धावांची जबरदस्त इनिंग खेळून गेला.
डबल सेंच्युरी थोडक्यात हुकली
यशची डबल सेंच्युरी थोडक्यात हुकली. त्याने 243 चेंडूत 28 फोर आणि 2 सिक्ससह 193 धावा फटकावल्या. यामुळे नॉर्थला ईस्ट झोनवर आघाडी मिळवता आली. त्याने चौथ्या फर्स्ट क्लास सामन्यात चौथं शतक झळकावलं. याआधी त्याने दिल्लीकडून दमदार रणजी डेब्यु केला. तिथे त्याने दोन शतक आणि एक डबल सेंच्युरी मारली.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला
दिल्लीच्या यश ढुलने यावर्षी क्रिकेट जगतात आपली ओळख बनवली. यशच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता.
View this post on Instagram
पृथ्वी शॉ च शतक
विशेष म्हणजे यश प्रमाणेच पृथ्वी शॉ ने सुद्धा दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शतक झळकावलं. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली सुद्धा 2018 साली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. शॉ वेस्ट झोनकडून खेळतोय. नॉर्थ ईस्ट झोनविरोधात त्याने 113 धावा फटकावल्या. हे दोन्ही प्लेयर्स आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतात.
