Duleep Trophy 2026 : इशान आणि वैभवच्या नेतृत्वात ईस्ट झोन संघ 13 वर्षांनी अंतिम फेरीत, सेमीफायनलमध्ये अशी झाली लढत

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सेंट्र्ल झोन आणि ईस्ट झोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ईस्ट झोनचा वरचष्मा राहिला. ईस्ट झोनने सेंट्रल झोनला 4 विकेटने पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली आहे.

Duleep Trophy 2026 : इशान आणि वैभवच्या नेतृत्वात ईस्ट झोन संघ 13 वर्षांनी अंतिम फेरीत, सेमीफायनलमध्ये अशी झाली लढत
Duleep Trophy 2026 : इशान आणि वैभवच्या नेतृत्वात ईस्ट जोन संघ 13 वर्षांनी अंतिम फेरीत, सेमीफायनलमध्ये अशी झाली लढत
Image Credit source: BCCI/Viral Video Grab
| Updated on: Sep 01, 2026 | 5:25 PM

Duleep Trophy 2026: इशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोन संघ दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. उपांत्य फेरीत ईस्ट झोनचा सामना गतविजेत्या सेंट्रल झोनशी झाला. या सामन्यात सेंट्रल झोनला डोकंच वर काढू दिलं नाही. पहिल्या डावात बरोबरी साधल्यानंतर दुसऱ्या डावात हिशेब चुकता केला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच ईस्ट झोनने सेंट्रल झोनचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयासह ईस्ट झोनने 13 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सेंट्रल झोनने पहिल्या डावात 266 धावांचा खेळी केली होती. या डावात रिंकू सिंग 60 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात ईस्ट झोनने पहिल्या डावात 266 धावा केल्या. या डावात वैभव सूर्यवंशीने 92, अभिमन्यु ईश्वरन 69 धावांची खेळी केली होती. पहिल्या डाव बरोबरीत सुटल्यानंतर ईस्ट झोनने दुसऱ्या डावात कमबॅक केलं. सेंट्रल झोनचा दुसरा डाव 158 धावांवर आटोपला. मुकेश कुमारने 4 विकेट, मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. या विजयी धावांचा पाठलाग करताना ईस्ट झोनने 6 गमवाल्या आणि लक्ष्य गाठलं. या डावात वैभव सूर्यवंशीने 40 आणि इशान किशनने नाबाद 39 धावा केल्या. या समन्यात ईस्ट झोनने 4 गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात या विक्रमांची नोंद

वैभव सूर्यवंशीने पहिल्या डावात अवघ्या 42 चेंडूंत अर्धशतक झळकावून दुलीप ट्रॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने पहिल्या डावात 81 चेंडूंत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 92 धावांची वादळी खेळी केली. दुसऱ्या डावातही त्याने 43 चेंडूंत 40 धावा केल्या.

मुकेश कुमार आणि शमीचा भेदक माऱ्यापुढे सेंट्रल झोनचं संघ गारद झाला. मुकेश कुमारने या सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या. पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट नावावर केल्या. त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला गेला. तर मोहम्मद शमीने दोन्ही डावात मिळून 5 विकेट्स घेतल्या.

कर्णधार इशान किशनची ‘फिनिशर’ची भूमिका बजावली. ईस्ट झोनची स्थिती नाजूक होती. 140 धावांवर 6 गडी गमावले होते. त्यामुळे हा सामना रोमांचक वळणावर पोहोचला होता. होता. पण, कर्णधार इशान किशनने 41 चेंडूंत नाबाद 39 धावा करत संघाला विजयाची चव चाखून दिली. यासह इशान किशनचा कर्णधार म्हणून असलेला अजेय रेकॉर्ड कायम राहिला आहे. त्याने आतापर्यंत 15 सामन्यात नेतृत्व केले असून 8 विजय आणि 7 सामने ड्रॉ झाले आहेत. त्याला अद्याप एकाही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us