अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वात यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत खेळणार, जाणून घ्या टीम बी बाबत सविस्तर

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत दिग्गज खेळाडू खेळणार असल्याने या स्पर्धेबाबत उत्सुकता वाढली आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी चार संघ जाहीर केले आहेत. यात ए, बी, सी, डी असे संघ असतील. दरम्यान बी संघाचं कर्णधार अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवलं आहे.

अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वात यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत खेळणार, जाणून घ्या टीम बी बाबत सविस्तर
| Updated on: Aug 14, 2024 | 6:04 PM

दुलीप ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी चार संघांची घोषणा केली आहे. स्पर्धेत ए, बी, सी आणि डी असे संघ असतील. यात बी संघाची धुरा अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघात दिग्गज खेळाडू असताना अभिमन्यू ईश्वरनकडे कर्णधारपद सोपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेडा, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत यासारखे दिग्गज खेळाडू असताना अभिमन्यू ईश्वरनची निवड का केली असावी? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. टीम एचं कर्णधारपद शुबमन गिलकडे, टीम सीचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे, तर टीम डीचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं आहे. 28 वर्षीय अभिमन्यु ईश्वरन अजूनही भारतीय संघात पदार्पणासाठी आतुर आहे. पण अजूनही त्याला संधी मिळालेली नाही. असं असातना दुलीप ट्रॉफीत कर्णधारपद मिळाल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

अभिमन्यू ईश्वरन हा टॉप ऑर्डर राईट हँडेड बॅट्समन आहे. त्याने 94 फर्स्ट क्लास, 88 लिस्ट ए आणि 34 टी20 सामने खेळला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्य त्याने 7006 धावा केल्या आहेत. तर 23 शतकं आणि 29 अर्धशतकं झळकावली आहे. लिस्ट ए मध्ये खेळलेल्या 88 सामन्यात 3847 धावा केल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमधील 34 सामन्यात 976 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने दोन गडी बाद केले आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध चार दिवसीय तीन सामन्यांची मालिका खेळली गेली. या पहिल्या सामन्यात 4 आणि 0 वर बाद झाला. दुसऱ्या साम्नयात 58 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात 0 आणि 22 धावा केल्या.

दुसरीकडे, रवींद्र जडेजा शेवटचा टी20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड झाली नाही. त्यामुळे रवींद्र जडेजा आता थेट दुलीप ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. दुलीप ट्रॉफीत चांगली कामगिरी केली तर त्याची निवड बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत होऊ शकते.

दुलीप ट्रॉफी टीम बी : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वाशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (विकेटकीपर).