
लखनौ : रवींद्र जाडेजाला का रॉकस्टार म्हटलं जातं, त्याचा पुरावा त्याने लखनौमध्ये दिला. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या ऑलराऊंडरने कमाल केली. रवींद्र जाडेजाने एक चेंडू टाकून ही कमाल दाखवली. चेंडू इतका खतरनाक होता, की जगातील कुठलाही फलंदाज त्या समोर सहजासहजी टिकू शकला नसता. मार्कस स्टॉयनिसने जाडेजाच्या या चेंडूचा सामना केला.
या चेंडूनंतर स्टॉयनिस पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जाडेजाचा हा आयपीएलमधील सर्वोत्तम चेंडू होता, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही.
बोल्ड झालोय, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता
लखनौच्या इनिंगमधील 7 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजाने ही ओव्हर टाकली. जाडेजाचा हा चेंडू लेग स्टम्पवर पडला. पण बॅट्समनचा ऑफ स्टम्प उडाला. जाडेजाचा हा चेंडू खूपच वळला. त्यामुळे स्टॉयनिसचा ऑफ स्टम्प उडाला. विकेट गेल्यानंतर स्टॉयनिसच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसले. आपण बोल्ड झालोय, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
?.?.?.?.?!
That was an epic delivery from @imjadeja ??
Follow the match ▶️ https://t.co/QwaagO40CB #TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/dhPSVB4BuF
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
बॅटने फेल, चेंडूने हिट
रवींद्र जाडेजाची बॅट विशेष चाललेली नाही. तो चेंडूने धुमाकूळ घालतोय. जाडेजाने 9 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्यात. त्याचा इकॉनमी 7.50 प्रति ओव्हर आहे. बॅटने त्याचा परफॉर्मन्स सरासरीपेक्षा कमी आहे. 7 इनिंग्समध्ये 18.40 च्या सरासरीने 92 धावा केल्या आहेत. भले बॅटने नसेल, चेंडूने जाडेजा आपला प्रभाव दाखवून देतोय.
लखनौमध्ये चेन्नईच्या स्पिनर्सचा जलवा
लखनौच्या पीचवर चेन्नईच्या स्पिनर्सनी कमाल केली. मोइन अलीने 4 ओव्हरमध्ये 13 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या. माहीश तीक्ष्णाने 2 ओव्हरमध्ये 11 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. रवींद्र जाडेजाने किफायती गोलंदाजी केली. त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 रन्स देऊन एक विकेट काढला. लखनौच्या टीमने 9.4 ओव्हरमध्ये 44 धावात 5 विकेट गमावल्या होत्या.
चांगली बॅटिंग लाइनअप असून सुद्धा लखनौची टीम आपल्या घरी स्पिन फ्रेंडली विकेट बनवतेय. या रणनितीमध्ये त्यांचे मोठे हिटर्स काइल मेयर्स, स्टॉयनिस आणि पूरन चालत नाहीयत.