AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs CSK IPL 2023 Live Score : चेन्नई विरुद्ध लखनौ सामना पावसामुळे रद्द

| Updated on: May 03, 2023 | 7:24 PM
Share

LSG vs CSK IPL 2023 Highlight In Marati | लखनौ सुपर जायंट्सचा मागचा सामना वादांमुळे गाजला होता. सीएसके विरुद्धच्या मॅचमध्ये हे सर्व वाद मागे सोडून लखनौची टीम मैदानात उतरली होती.

LSG vs CSK IPL 2023 Live Score : चेन्नई विरुद्ध लखनौ सामना पावसामुळे रद्द
LSG vs CSK IPL 2023

लखनौ : IPL 2023 मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना पावसामुळे रद्द झाला.  इंडियन प्रीमियर लीगमधील हा 45 वा सामना होता.  लखौनमध्ये ही मॅच सुरु होती. लखनौचा RCB विरुद्धचा मागचा सामना चांगलाच गाजला होता. जीत-हारपेक्षा मैदानावरील वादांमुळे या मॅचची जास्त चर्चा झाली होती. लखनौला या मॅचआधी एक झटका बसला. त्यांचा नियमित कॅप्टन केएल राहुलला दुखापत झाली. त्याच्याजागी दुसरा प्लेयर क्रृणाल पंड्या लखनौच नेतृत्व करत होता.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 May 2023 07:02 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : सामना पावसामुळे रद्द

    चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना अखेर पावसामुळे रद्द झाला आहे.

  • 03 May 2023 05:23 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : पावसाचा व्यत्यय

    लखनौच्या इनिंगमधील 20 वी ओव्हर सुरु असताना पावसाने व्यत्यय आणला. 19.2 ओव्हरमध्ये 7 बाद 125 धावा झाल्या आहेत.

  • 03 May 2023 05:18 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : आयुष बदोनीची हाफ सेंच्युरी

    19 ओव्हरमध्ये लखनौच्या 6 बाद 125 धावा झाल्या आहेत. आयुष बदोनी 33 चेंडूत 59 धावांवर खेळतोय. त्याने 2 फोर आणि 4 सिक्स मारले आहेत. दीपक चाहरला 19 व्या ओव्हरमध्ये बदोनीने धुतलं.

  • 03 May 2023 05:14 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : निकोलस पूरन आऊट

    18 ओव्हरमध्ये लखनौच्या 6 बाद 105 धावा झाल्या आहेत. आयुष बदोनी 38 धावांवर खेळतोय. निकोलस पूरनची विकेट 20 धावांवर केलीय.

  • 03 May 2023 05:14 PM (IST)

    माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची परभणीत पवारांच्या राजीनाम्यावर टिप्पणी

    शरद पवारांनी निवृत्ती कुठल्या कारणाने घेतली

    घरच्या कारणांनी घेतली की पक्षात बंड होण्याच्या कारणाने घेतली? का वयाच्या मानाने घेतली

    आमच्या पक्षात अध्यक्ष पदासाठी आठ दहा नेते आहेत असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं

    त्यामुळे सुप्रिया सुळेंना त्यांचा पक्ष अध्यक्ष करण्यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल

    राष्ट्रवादीमध्ये खूप खळबळ माजलेली आहे, मोठा भूकंप होणार अशा बातम्या मी टीव्हीवर ऐकतोय

    त्या भूकंपाची तीव्रता किती आहे हे झाल्यावरच कळेल

    अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर मी जास्त काही बोलू शकत नाही

    मात्र काहीही घडलं तर नवल वाटायला नको

  • 03 May 2023 05:02 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : पूरन-बदोनीने सावरला डाव

    पाच विकेट गेल्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने लखनौचा डाव सावरला. 16 ओव्हर अखेरीस लखनौच्या 5 बाद 83 धावा झाल्या आहेत. पूरन 18, बदोनी 20 धावांवर खेळतोय.

  • 03 May 2023 04:45 PM (IST)

    अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्याला झोडपलं

    शेतातील उभे पीक जमीनदोस्त शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

    वादळी वाऱ्यामुळे अनेक विद्युत पोल पडले असून ताराही तुटल्या आहेत. त्यामुळे काल रात्रीपासूनच परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक वृक्षही रस्त्यावर उन्मळून पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे

    भंडाऱ्यात लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात ताशी 40 किमी पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीनं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 03 May 2023 04:35 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : लखनौची पाचवी विकेट

    लखनौ सुपर जायंट्सची पाचवी विकेट गेलीय. मोइन अलीने आपल्या बॉलिंगवर करण शर्माला कॅच आऊट केलं. त्याने 16 चेंडूत 9 धावा केल्या. 11 व्या ओव्हरमध्ये लखनौची 5 बाद 45 अवस्था झाली आहे.

  • 03 May 2023 04:27 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : लखनौला चौथा धक्का

    लखनौ सुपर जायंट्सची चौथी विकेट गेलीय. जाडेजाने मार्कस स्टॉयनिसला क्लीन बोल्ड केलं. स्टॉयनिसने 6 रन्स केल्या. लखनौच्या 39 रन्सवर 4 विकेट गेल्यात. 9 वी ओव्हर सुरु आहे.

  • 03 May 2023 04:19 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट

    मनन व्होराच्या रुपाने लखनौ सुपर जायंट्सला दुसरा धक्का बसला आहे. तीक्ष्णाने व्होराला 10 धावांवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर कॅप्टन क्रृणाल पंड्या खात न उघडताच तंबूत परतला. त्याला तीक्ष्णाने शुन्यावर रहाणेकरवी झेलबाद केलं. पावरप्लेच्या 6 ओव्हर अखेरीस लखनौची 3 बाद 31 धावा झाल्या आहेत.

  • 03 May 2023 04:08 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : लखनौला पहिला धक्का

    4 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. लखनौच्या 1 बाद 18 धावा झाल्या आहेत. मोइन अलीने काइल मेयर्सला गायकवाडकरवी झेलबाद केलं. मेयर्सने 17 चेंडूत 14 धावा करताना 2 चौकार मारले.

  • 03 May 2023 03:51 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : लखनौ विरुद्ध चेन्नई सामन्याला सुरुवात

    लखनौ विरुद्ध चेन्नई सामन्याला सुरुवात झाली आहे. काइल मेयर्स आणि मनन व्होरा ही लखनौची सलामीची जोडी मैदानात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये लखनौच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत.

  • 03 May 2023 03:38 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : प्रमुख गोलंदाजाच चेन्नईच्या टीममध्ये पुनरागमन

    दीपक चाहर आजच्या सामन्यात खेळणार आहे. पावरप्लेमध्ये विकेट घेण्याची त्याची खासियत आहे. दुखापतीमुळे तो बाहेर होता. आकाश सिंहच्या जागी तो खेळणार आहे.

  • 03 May 2023 03:36 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : एमएस धोनीने जिंकला टॉस

    एमएस धोनीने टॉस जिंकला आहे. चेन्नई सुपर किंग्सने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लखनौ सुपर जायंट्सची टीम पहिली बॅटिंग करेल.

  • 03 May 2023 03:23 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : टॉसला विलंब

    आज सीएसके आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना होणार आहे. पावसामुळे टॉसला विलंब होतोय.

  • 03 May 2023 02:33 PM (IST)

    शरद पवारच अध्यक्ष राहतील असा विश्वास – हसन मुश्रीफ

    केंद्रात सुप्रिया सुळे, राज्यात अजितदादा अशी चर्चा नाही,

    राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीम यांचं वक्तव्य

  • 03 May 2023 02:16 PM (IST)

    पिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? यावर आजच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

    अध्यक्षाला माझा पाठिंबा राहील, मग सुप्रिया सुळे असल्या तरी चालेल… अप्रत्यक्षपणे पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मांडलं मत

    अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असा कोणताही गट नसल्याचा अण्णा बनसोडे यांचा दावा

  • 03 May 2023 02:02 PM (IST)

    बैठकीची वेळ लवकरच ठरेल : सुनील तटकरे

    मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक लवकरच ठरेल

    दोन दिवस विचार करण्याचा शरद पवार यांनी वेळ मागितला

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांची माहिती

    बैठक ठरली की कळविले जाईल – तटकरे

  • 03 May 2023 01:52 PM (IST)

    LSG vs CSK Live Score : लखनौने कॅप्टन बदलला

    आज सीएसके विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल लखनौ टीमच नेतृत्व करताना दिसणार नाही. दुखापतीमुळे तो खेळणार नाहीय. त्याच्याजागी कृणाल पंड्या टीमच नेतृत्व करेल.

Published On - May 03,2023 1:51 PM

Follow us
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.