AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडिया 52 धावांनी आघाडीवर, सामना रंगतदार स्थितीत

England vs India 5th Test Day 2 Stumps and Highlights : इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. दुसर्‍या दिवसापर्यंत भारताने 52 धावांची आघाडी मिळवली आहे.

ENG vs IND : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडिया 52 धावांनी आघाडीवर, सामना रंगतदार स्थितीत
Yashasvi Jaiswal IND vs ENG 5th TestImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 02, 2025 | 12:50 AM
Share

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना दुसऱ्या दिवसानंतर रंगतदार स्थितीत पोहचला आहे. यशस्वी जैस्वाल याने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्‍या डावात 52 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात झॅक क्रॉली याने केलेल्या 64 आणि हॅरी ब्रूक याच्या 53 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 247 धावा केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 23 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. त्यानतंर भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 18 षटकांत 2 विकेट्स गमावून 75 धावा केल्या. भारताने केएल राहुल (7) साई सुदर्शन (11) यांच्या रुपात 2 विकेट्स गमावल्या. तर यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप ही जोडी नाबाद परतली. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ

भारताने पहिल्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या होत्या. इंग्लंडने भारताला दुसऱ्या दिवशी 20 धावांच्या मोबदल्या झटपट 4 झटके देत 224 धावावंर गुंडाळलं. भारतासाठी करुण नायर याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर गस एटकीन्सन याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर जोश टंग याने तिघांना बाद करत गसला चांगली साथ दिली.

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडने पहिल्या डावात स्फोटक सुरुवात केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने वेगाने धावा केल्या. दोघांनी 6 पेक्षा अधिकच्या रनरेटने धावा केल्या. इंग्लंडने 7 व्या ओव्हरमध्येच 50 धावा पूर्ण केल्या. डकेट या दरम्यान उलटसुलट फटके मारत होता. आकाश दीपच्या बॉलिंगवर डकेट खूपदा वाचला. मात्र आकाशने डकेटचा टप्प्यात कार्यक्रम करत इंग्लंडला पहिला झटका दिला. डकेटने 43 धावा केल्या. झॅक क्रॉलीने सर्वाधिक 64 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि इंग्लंडला झटक्यावर झटके देत मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं.

ओव्हल कसोटी रंगतदार स्थितीत

ओली पोप याने 22 तर जो रुटने 29 धावा करत काही वेळ भारतीय गोलंदाजांचा सामना केला. मात्र मोहम्मद सिराज याने या दोघांना एलबीडब्ल्यू केलं. त्यानंतर सिराज आणि प्रसिधने इंग्लंडच्या काही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठू दिला. मात्र हॅरी ब्रूक याने एक बाजू लावून धरली. हॅरीने टी ब्रेकनंतर इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. हॅरीच्या रुपात इंग्लंडने नववी विकेट गमावली. हॅरीने 53 धावा केल्या. तर ख्रिस वोक्स याला खांद्याच्या दुखापतीमुळे बॅटिंगला येता आलं नाही. इंग्लंडने अशाप्रकारे पहिल्या डावात 247 धावा करत 23 ची आघाडी घेतली.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...