ENG vs IND : टीम इंडियाला 92 धावांचा फटका; पाचव्या सामन्यात पराभव फिक्स!

England vs India 5th Test : पाचव्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी भारतीय संघाला निर्णायक सामन्यात 92 धावांचा फटका बसला आहे. जाणून घ्या नक्की काय झालं?

ENG vs IND : टीम इंडियाला 92 धावांचा फटका; पाचव्या सामन्यात पराभव फिक्स!
ENG vs IND 5th Test
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Aug 03, 2025 | 9:19 PM

इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक याने टीम इंडिया विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी खणखणीत शतक झळकावलं आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं आहे. हॅरीने या विजयी धावांचा पाठलाग करताना शतक ठोकलं आहे. हॅरीने अवघ्या 91 चेंडूच्या मदतीने हे शतक झळकावलं. हॅरीच्या कसोटी कारकीर्दीतील 10 वं शतक ठरलं. हॅरीच्या या शतकामुळे इंग्लंड विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या खेळाला 1 बाद 50 धावांपासून सुरुवात केली. त्यानंतर ओपनर बेन डकेट याने अर्धशतक झळकावलं. मात्र टीम इंडियाने पहिल्या सत्रात इंग्लंडला झटपट 2 झटके दिले. प्रसिध कृष्णा याने बेन डकेट याला केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. डकेटने 83 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.

त्यानंतर मोहम्मद सिराज याने ओली पोप याला आऊट करत इंगद्लंडला तिसरा झटका दिला. पोपने 34 चेंडूत 27 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडची 3 बाद 106 अशी स्थिती झाली होती. भारतीय संघाने सामन्यावर पकड मिळवली. इंग्लंड अडचणीत सापडली होती. तेव्हा हॅरी ब्रूक याची एन्ट्री झाली. ब्रूकने जो रुट याला अप्रतिम साथ देत इंग्लंडचा डाव सावरला.

ब्रूकने मैदानात येताच फटकेबाजीला सुरुवात केली. या फटकेबाजीच्या नादात भारताला हॅरीला आऊट करण्याची संधी मिळाली. हॅरीने प्रसिधच्या बॉलिंगवर हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हॅरीने या प्रयत्नात डीप फाईन लेगवर कॅच दिला. मोहम्मद सिराज तिथे होता. सिराजने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. मात्र त्यानंतर सिराजचा पाय बाउंड्री लाईनला लागला. त्यामुळे हॅरीला जीवनदान मिळालं. तसेच इंग्लंडला 6 धावाही मिळाल्या.

हॅरीला 19 धावांवर जीवनदान मिळालं. हॅरीने या संधीचा चांगलाच फायदा घेत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. हॅरीने यासह खणखणीत शतक झळकावलं. हॅरीने याआधी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील एजबेस्टनमधील सामन्यात शतक केलं होतं.

हॅरीची तोडफोड खेळी

हॅरीने धुव्वाधार बॅटिंग करत दुसर्‍याच सत्रात इंग्लंडला 300 पार पोहचवलं. त्यानंतर आकाश दीप याच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याच्या प्रयत्नात हॅरी कॅच आऊट झाला. अशाप्रकारे हॅरीच्या या शतकी खेळीचा शेवट झाला. हॅरीने अवघ्या 98 चेंडूत 111 धावा केल्या. हॅरीने या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार लगावले. भारताला अशाप्रकारे 92 धावांचा फटका बसला. तसेच जो रुट आणि हॅरीने चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने यासह मालिका विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.