ENG vs SA : दक्षिण आफ्रिका वनडेनंतर टी 20I मालिका जिंकण्यासाठी सज्ज, इंग्लंड करो या मरो सामन्यात विजयी होणार?
England vs South Africa 2nd T20i Preview : इंग्लंडवर वनडेनंतर टी 20i मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांच्या टी20i मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे.

दक्षिण आफ्रिकेला यजमान इंग्लंड विरुद्ध वनडेनंतर टी 20I मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दक्षिण आफ्रिकेने 3 मॅचच्या वनडे सीरिजमधील पहिले 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. इंग्लंडने वनडे सीरिज 2-1 ने जिंकली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टी 20I मालिकेतही विजयी सलामी दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 3 मॅचच्या सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची नामी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान इंग्लंडसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि करो या मरो असा आहे. इंग्लंडला आव्हान कायम राखण्यासह दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही स्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे. त्यामुळे इंग्लंड करो या मरो सामन्यात कमबॅक करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
दक्षिण आफ्रिका इंग्लंडवर वरचढ
एडन मारक्रम टी 20I मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करत आहे. तर हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ एकूण 27 टी 20I सामन्यांमध्ये आमेनसामने आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या 27 पैकी सर्वाधिक 14 सामन्यांमध्ये इंग्लंडला धोबीपछाड दिला आहे. तर इंग्लंडचा 12 वेळा विजय झाला आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20I सामना कुठे आणि कधी होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामना कधी?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामना शुक्रवारी 12 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामना कुठे?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामना मँचेस्टरमधील एमीरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर हा सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.
पहिल्या टी 20I सामन्यात काय झालं?
उभयसंघातील पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला विलंबाने सुरुवात झाली. परिणामी काही ओव्हर कमी कराव्या लागल्या. इंग्लंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने 7.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 97 धावा केल्या. त्यानंतर पुन्हा पावसाची सुरुवात झाली. पावसाने बराच वेळ बॅटिंग केली. त्यामुळे सामन्यातील आणखी काही षटकं कमी करण्यात आली. इंग्लंडला डीएलएसनुसार 5 ओव्हरमध्ये 69 धावांचं आव्हान मिळालं. मात्र इंग्लंडला 54 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 14 धावांनी हा सामना आपल्या नावावर केला.
