
इंग्लंड क्रिकेट टीमने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 190 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने श्रीलंकेला विजयासाठी 483 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेनेही जोरदार झुंज देत या आव्हानापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र डोंगराएवढ्या आव्हानापुढे श्रीलंकेचे सर्व प्रयत्न अपुरे पडले. श्रीलंकेला 86. 4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 292 धावा केल्या. इंग्लंडने या विजयासह मालिकाही जिंकली. इंग्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. दोन्ही डावात शतकी खेळी करणारा जो रुट इंग्लंडच्या विजयाचा खरा हिरो ठरला.
श्रीलंकेकडून दुसर्या डावात दिनेश चांदीमल, दिमुथ करुणारत्ने आणि कॅप्टन धनंजया डी सिल्वा या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. या तिघांनी अनुक्रमे 58, 55 आणि 50 अशा धावा केल्या. मिलन रथनायके याने 56 बॉलमध्ये 43 रन्स केल्या. अनुभवी अँजलो मॅथ्युजने 91 बॉलमध्ये 36 धावा केल्या. पाथुम निसांकाने 14, निशान मदुशका याने 13 आणि लहीरु कुमाराने 10 धावांची भर घातली.प्रभाथ जयसूर्या आणि कामिंदु मेंडीस या दोघांनी 4-4 धावा केल्या. तर असिथा फर्नांडोने शून्यावर नाबाद परतला. इंग्लंडकडून गस एटकीन्सन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स आणि ओली स्टोन या दोघांनी प्रत्येकी दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर शोएब बशीरने 1 विकेट घेतली.
इंग्लंडने जो रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 427 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रींलेकचा पहिला डाव हा 196 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली. जो रुटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 251 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला 483 धावांचं आव्हान मिळालं. मात्र श्रीलंकेला 292 धावांपर्यंतच पोहचता आलं. इंग्लंडने अशाप्रकारे सामना जिंकला.
इंग्लंडचा सलग दुसरा विजय
A thumping win at Lord’s gives England an unassailable 2-0 lead over Sri Lanka 👏#WTC25 | #ENGvSL 📝: https://t.co/QMDJOHhYGK pic.twitter.com/ohHUVMd6Hr
— ICC (@ICC) September 1, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.