
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे. धनंजया डी सिल्वा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंड मालिकेतील सलामीचा सामना जिंकल्याने ते 1-0 ने आघाडीवर आहेत. त्यामुळे श्रीलंकेसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे श्रीलंकेचा हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
श्रीलंका आणि इंग्लंडने या दुसर्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. श्रीलंकेने दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विश्वा फर्नांडो आणि कुसल मेंडीस याच्या जागी पाथुम निसांका आणि लहिरु कुमारा या दोघांना संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंडमध्ये एकमेव बदल केला गेला आहे. मार्क वूड याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश करण्यात आला आहे. मार्क वूड याला पहिल्या कसोटी दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे वूडला मालिकेतू बाहेर पडावं लागलं. वूडच्या जागी बदली खेळाडू म्हणून जॉश हल याला संधी दिली गेली. मात्र त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
दरम्यान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आतापर्यंत एकूण 37 कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने भिडले आहेत. इंग्लंडचाच दबदबा राहिला आहे. इंग्लंडने श्रीलंकेवर 37 पैकी 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने इंग्लंडला 8 वेळा पराभूत केलंय. तर 11 मॅचेस ड्रॉ राहिल्या आहेत.
इंग्लंडची पहिले बॅटिंग
Sri Lanka have won the toss and chosen to bowl first at Lord’s 🪙
Let’s go, lads! 💪
— England Cricket (@englandcricket) August 29, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.