
टीम इंडिया नववर्षात मायदेशात आयसीसी टी 20 वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. न्यूझीलंड या दोन्ही मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. चाहत्यांना या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची प्रतिक्षा लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने श्रीलंका दौऱ्यातील वनडे आणि टी 20i सीरिजसाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंड टी 20i वर्ल्ड कप सहयजमान असलेल्या श्रीलंकेविरुद्ध दोन्ही मालिकेत भिडणार आहे.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात वनडे आणि टी 20i या दोन्ही मालिकांमध्ये एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी प्रत्येकी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हॅरी ब्रूक दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुखापतीमुळे टी 20i मालिकेला मुकावं लागलं आहे. आर्चरच्या जागी टी 20i संघात ब्रायडन कार्स याला संधी मिळाली आहे. तसेच विकेटकीपर बॅट्समन असेल्या जेमी स्मिथ याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे. तर झॅक क्रॉली याचं एकदिवसीय संघात कमबॅक झालं आहे. क्रॉलीने अखेरचा एकदिवसीय सामना 2 वर्षांआधी खेळला होता.
इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. एकदिवसीय मालिकेचा थरार हा 22 ते 27 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. हे तिन्ही सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
पहिला सामना, 22 जानेवारी, कोलंबो
दुसरा सामना, 24 जानेवारी, कोलंबो
तिसरा सामना, 27 जानेवारी, कोलंबो
उभयसंघात वनडेनंतर 30 जानेवारीपासून टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका-इंग्लंड यांच्यातील तिन्ही सामने पल्लेकेले स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
पहिला सामना, 30 जानेवारी
दुसरा सामना, 1 फेब्रुवारी,
तिसरा सामना, 3 फेब्रुवारी,
टी 20i सीरिजसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कॅप्टन), रेहान अहमद, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, सॅम कुरन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद, फिल साल्ट, जोश टंग आणि ल्यूक वुड.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद, जो रूट आणि ल्यूक वुड.