
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या फलंदाजांनी इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात विस्फोटक बॅटिंग केली. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 416 धावा केल्या. विंडिजने या प्रत्युत्तरात 111.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 457 रन्स करत 41 धावांची आघाडी घेतली. शामर जोसेफ आणि जोशुआ डा सिल्वा या जोडीने दहाव्या विकेटसाठी 71 धावांची निर्णायक भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी विस्फोटक बॅटिंग केली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत टीमला आघाडी मिळवून दिली. मात्र शामर जोसेफ 33 धावांवर बाद होताच विंडिजचा डाव आटोपला. शामरने 27 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्स खेचले. त्यापैकी शामरने ठोकलेल्या एका सिक्सवर स्टेडियममधील कौल तुटला. तुटलेल्या कौलाचा तुकडा हा स्टेडियमधील उपस्थितीत चाहत्यांमध्ये पडला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
गस ऍटकिन्सन विंडिजच्या डावातील 107 वी ओव्हर टाकायला आला. शामरने गसच्या या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर कडक सिक्स खेचला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर एकही रन मिळाला नाही. मात्र चौथ्या बॉलवर डीप बॅकवर्डच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला. शामरने मारलेला फटका इतका जोरदार होता की स्टेडियमच्या छतावरील कौलाचे तुकडे तुकडे झाले. कौलाचे तुकडे क्रिकेट चाहत्यांमध्ये पडले. पण यात कुणालाही दुखापत झाली नाही. या सर्व घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शामर जोसेफ याला मार्क वूडने विंडिजच्या डावातील 112 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर आऊट केलं. तसेच जोशुआने 122 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 षटाकरांच्या मदतीने 82 धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान शामर आणि जोशुआ यांनी केलेली 71 धावांची इंग्लंड विरुद्धची ही दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. याआधी 12 वर्षांपूर्वी 2012 साली दिनेश रामदिन आणि टीनो बेस्ट या दोघांनी 143 रन्सची पार्टनरशीप केली होती.
शामर जोसेफचा खणखणीत सिक्स, कौलाचे तुकडे
Omg that six by Shamar Joseph broke the roof and part of that roof fell on the spectators unbelievable#WTC25 | 📝 #ENGvWI pic.twitter.com/xU8IMTgF5T
— Cinephile (@jithinjustin007) July 20, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.