
जोशुआ डा सिल्वा आणि शामर जोसेफ या जोडीने दहाव्या विकेटसाठी केलेल्या 71 धावांच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 41 रन्सची लीड घेतली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 416 धावांच्या प्रत्युत्तरात विंडिजने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 111.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 457 धावा केल्या. विंडिजकडून कावेम हॉज याने सर्वाधिक 120 रन्स केल्या. तर जोशुआ डा सिल्वा आणि अलिक अथनाझे या दोघांनी प्रत्येकी 82 धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी चांगली साथ दिली.
विंडिजने कावेम हॉजच्या 121 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 84 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 351 धावा केल्या होत्या. विंडिज फक्त 65 धावांनी मागे होती. त्यानंतर विंडिजने तिसऱ्या दिवशी 5 विकेट्स गमावून 106 धावा जोडल्या आहेत. या 106 धावांमध्ये जोसेफ आणि जोशुआ या दोघांनी दहाव्या विकेटसाठी केलेल्या 71 धावांच्या भागीदारीचा समावेश आहे. जोशुआने 122 चेंडूमध्ये नाबाद 82 धावांवर नाबाद राहिला. तर जोसेफने 27 बॉलमध्ये 33 रन्स केल्या. जोसेफ आऊट होताच विंडिजचा डाव आटोपला.
जेसन होल्डर (23) आणि जोशुआ डा सिल्वा (32) या जोडीने तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. मात्र इंग्लंडने विंडिजला ठराविक अंतराने झटके दिले. होल्डर अवघ्या 4 धावा जोडून 27वर आऊट झाला. त्यानंतर केविन सिंक्लेअर याने 4 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. अल्झारी जोसेफने 10 धावांचं योगदान दिलं. जेडेन सील्स आला तसाच परत गेला. त्यामुळे विंडिजची स्थिती 9 बाद 386 अशी झाली.
आता इंग्लंडला नाममात्र का होईना आघाडी मिळेल, असं वाटत होतं. मात्र जोशुआ डा सिल्वा आणि शामर जोसेफ या जोडीने चाबुक बॅटिंग केली. जोशुआ आणि शामर या दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या जोडीने इंग्लंडला चांगलंच रडवलं. दोघींनी केलेल्या फटकेबाजीमुळे विंडिजला 41 धावांची का होईना, पण आघाडी मिळाली. जेम्स अँडरसनशिवाय खेळताना पहिल्याच कसोटीत विंडिजने इंग्लंडला विकेटसाठी चांगलंच झुंजवलं.
तसेच कावेम होजचा अपवाद वगळता विंडिजच्या पहिल्या 4 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्यांना फार योगदान देता आलं नाही. मिकील लुईस 21, क्रेग ब्रॅथवेट 48, कर्क मॅकेन्झी याने 11 आणि अलिक अथनाझेने 82 धावा केल्या. तर इंग्लंडकडून वोक्सचा अपवाद वगळता गस एटीकसन आणि शोएब बशीर या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन बेन स्टोक्स आणि मार्क वूड या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
विंडिजला पहिल्या डावात 41 धावांची आघाडी
Valuable lower order contributions give West Indies the lead against England 👏 #WTC25 | 📝 #ENGvWI: https://t.co/vrnDzpGI5a pic.twitter.com/vaxLAj9awZ
— ICC (@ICC) July 20, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.