Video : शुबमन गिलला बाद करण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजाचा रडीचा डाव, केलं असं की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना एजबेस्टनमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात चांगलीच आघाडी घेतली आहे. शुबमन गिलच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. असं असताना त्याला बाद करण्यासाठी ब्रायडन कार्सने रडीचा डाव खेळला.

Video : शुबमन गिलला बाद करण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजाचा रडीचा डाव, केलं असं की...
Video : शुबमन गिलला बाद करण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजाचा चिडीचा डाव, केलं असं की...
Image Credit source: video grab
| Updated on: Jul 03, 2025 | 4:35 PM

भारताला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कमबॅकसाठी काहीही करून दुसरा कसोटी सामना जिंकणं भाग आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. टीम इंडियाने पहिल्या डावात दमदार खेळी केली आहे. पहिल्या दिवशी 5 गडी गमवून 310 धावा केल्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशीही भारताचे चांगली सुरुवात केली असून 350 पार धावांपर्यंत मजर मारली आहे. कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून शुबमन गिलच्या फलंदाजीला आणखी धार चढली आहे. शुबमन गिलचा आक्रमक अंदाज पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांना धडकी भरली आहे. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी रडीचा डाव सुरु असल्याचं मैदानात पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स यांच्यात वाद झाला. कार्सचा रडीचा डाव पाहून कर्णधार गिल फलंदाजीवेळी नाराज दिसला.

पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताच्या डावातील 34 व्या षटकात हा प्रकार घडला. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स गोलंदाजी करत होता. चौथ्या चेंडू टाकत असताना त्याने गोलंदाजीवेळी विचित्र एक्शन केली. कार्सने रन अप करताना नॉन बॉलिंग आर्म हवेत उचलला. यामुळे शुबमन गिल संभ्रमात पडला. त्यामुळे त्याने चेंडू फेकण्याआधीच खेळपट्टीवरून बाजूला झाला. गिलने हा चेंडू खेळण्यास मनाई केली. कार्सने गिलने उचलेलं पाऊल पाहून आश्चर्य व्यक्त केलं. गिलने त्याची कृती पाहून तिथेच सुनावलं. मैदानातील पंचांनी शेवडी हा चेंडू डेड घोषित केला.

शुबमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ कशी कामगिरी करेल हे मालिका संपल्यावरच कळेल. पहिल्या सामन्यात दमदार खेळी करूनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे भारताने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 400 पार धावा केल्या तर विकेट घेण्याची क्षमता गोलंदाजांमध्ये आहे का? असा प्रश्न आहे. त्यात जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे या सामन्यात नाही. त्यामुळे भारतावर आणखीच दडपण आहे.