AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Joe Root : जो रुटचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया विरुद्ध ओव्हलमध्ये ऐतिहासिक कामगिरी

Joe Root World Record : जो रुट याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेत तिसरं शतक झळकावलं. रुटने यासह या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 500 धावांचाही टप्पाही ओलांडला.

Joe Root : जो रुटचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया विरुद्ध ओव्हलमध्ये ऐतिहासिक कामगिरी
Joe Root England CricketerImage Credit source: Icc X Account
| Updated on: Aug 04, 2025 | 12:41 AM
Share

इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा असणारा अनुभवी फलंदाज जो रुटने या कसोटी क्रिकेटमधील धावा करण्याचा झंझावात कायम राखत इतिहास घडवला आहे. जो रुटने केनिंग्टन ओव्हलमध्ये टीम इंडिया विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात दमदार शतक ठोकलं. रुटने विजयी धावांचा पाठलाग करताना ही कामगिरी केली. रुटने एकूण 105 धावा केल्या. इंग्लंडच्या फलंदाजाने या खेळीत 12 चौकार लगावले. रुटचं हे कसोटी कारकीर्दीतील 39 वं शतक ठरलं. रुटने यासह श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याला मागे टाकलं. रुटने संगकाराला कसोटीतील शतकांबाबत मागे टाकलं. रुटने संगकाराचा 38 शतकांचा विक्रम मोडला.

रुटचं भारताविरुद्धचं केनिंग्टन ओव्हलमधील हे 13 वं कसोटी शतकं ठरलं. रुटने यासह ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ आणि इंग्लंडच्या जॅक हॉब्स यांना मागे टाकलं. या दोघांनीही एकाच संघाविरुद्ध प्रत्येकी 12-12 शतकं लगावली होती. तर रुटने या 13 व्या शतकासह भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्या 13 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. रुटआधी गावसकरांनी एकाच संघाविरुद्ध 13 शतकं लगावली होती. गावसकरांनी वेस्ट इंडिज विरुद्ध हा कारनामा केला होता. तर एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 19 शतकांचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे दिग्ग्ज माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमॅन यांनी इंग्लंड विरुद्ध 19 शतकं झळकावली होती.

रुटची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी

रुटने इंग्लंडमध्ये लगवलेलं हे 24 वं कसोटी शतक ठरलं. रुटने यासह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. रुट एका देशात सर्वाधिक कसोटी शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. रुटने यासह रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने या माजी त्रिकुटाला मागे टाकलं. या तिघांनी मायदेशात प्रत्येकी 22-22 शतकं लगावली होती.

5 वर्षांत 22 शतकं

दरम्यान जो रुटने याने गेल्या 5 वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रुटने गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने खेळतच नाहीय तर धावाही कुटतोय. रुटने कसोटीतील 39 पैकी 22 शतकं ही गेल्या 5 वर्षात लगावली आहेत. यावरुन रुट काय खेळलाय याचा अंदाज बांधता येतो. रुटने यासह केव्हाच फॅब 4 मधील उर्वरित तिघांना मागे टाकलं. कसोटीत स्टीव्हन स्मिथ याने 36, केन विलियमसन 33 आणि विराट कोहली याने 30 शतकं झळकावली आहेत.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार