Women’s T20 World Cup 2026: दीड महिन्याआधीच इंग्लंड संघाची घोषणा, 18 वर्षीय खेळाडूला संधी

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा वर्ल्डकप इंग्लंडमध्ये होणार असून यजमान संघाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात 18 वर्षीय खेळाडूला संधी दिली आहे.

Women’s T20 World Cup 2026: दीड महिन्याआधीच इंग्लंड संघाची घोषणा, 18 वर्षीय खेळाडूला संधी
Women’s T20 World Cup 2026: दीड महिन्याआधीच इंग्लंड संघाची घोषणा, 18 वर्षीय खेळाडूला संधी
Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 28, 2026 | 5:19 PM

England Squad Women’s T20 World Cup: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका या संघात होणार आहे. तर भारतीय महिला संघाचा पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा पहिला सामना 30 जून, तर दुसरा सामना 2 जुलैला खेळला जाईल. अंतिम फेरीचा सामना लॉर्ड्सवर 5 जुलैला होईल. इंग्लंड महिला संघाने वुमन्स वर्ल्डकप 2009 स्पर्धेच्या पहिल्या पर्वात विजय मिळवला होता. त्यानंतर विजय काही हाती लागला नाही. तीन वेळा अंतिम फेरी गाठली पण पदरी निराशा पडली. 2012, 2014 आणि 2018 मध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 6 वेळा जेतेपद मिळवलं आहे. न्यूझीलंडने एकदा जेतेपद मिळवलं आहे. असं असताना इंग्लंडने पुन्हा जेतेपद मिळवण्याची तयारी सुरू केली आहे.

इंग्लंडने वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाची धुरा नॅट स्कायव्हर ब्रंट हीच्या हाती आहे. तर पहिल्यांदाच 18 वर्षीय युवा खेळाडूला या संघात संधी मिळाली आहे. टिली कॉर्टीन कोलमॅन अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण तिची संघात नियुक्ती करून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोलमॅन द हंड्रेडमध्ये साउदर्न ब्रेवसाठी खेळली आहे. तिने 17 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तिचा इकोनॉमी रेट हा फक्त 6.8 प्रति षटक इतका आहे. मागच्या पर्वात तिने 11 विकेट घेतल्या होत्या आणि इकोनॉमी रेट हा 5.7 प्रति षटक इतका होता. या कामगिरीच्या जोरावर तिला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ

नॅट सायव्हर ब्रंट (कर्णधार), लॉरेन बेल, एलीस कॅप्सी, टिली कॉर्टीन कोलमॅन, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, डॅनी गिब्सन, एमी जोन्स, फ्रेया कँप, हेदर नाइट, लिन्से स्मिथ, इसी वोंग आणि डॅनी वायट.

Follow Us