AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डगमगलो नाही, खचलो नाही… मी पद सोडायला तयार, पण… उद्धव ठाकरे गर्जले

आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचा मोळावा पार पडला, या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.

डगमगलो नाही, खचलो नाही... मी पद सोडायला तयार, पण... उद्धव ठाकरे गर्जले
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 19, 2026 | 9:29 PM
Share

आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचा मोळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी तुम्हाला विचारतो. जसं तुम्ही मला जपलं, हा शिवसेनाप्रमुखांचा आदेश होता. मी कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या माणसाने एक बोट दाखवलं तर मी क्षणभरही पदावर राहत नाही. म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं. मला काही हवं असतं तर मी विधानसभेत बसलो असतो. ६० वर्ष पूर्ण झाले. मी १२ वर्षापासून नेतृत्व करतो. माझ्यावर जे आरोप झाले, ते खरे असतील तर मला सांगा मी आता पायउतार व्हायला तयार आहे.

तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो पक्षप्रमुख होईल. ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ देऊ नये. लाचार आणि गद्दार नको, लाचार गद्दार आणि भेसळयुक्त माणूस माझ्यावर आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मी पद सोडायला तयार आहे. मी डगमगलो नाही, मी खचलेलो नाही. अनेक संकट आली अनेक वादळं आली, मी पळणारा नाही. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच मी करेन. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी पद सोडल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला सुप्रीम कोर्ट आणि कायदा मंत्री बॅटमिंटन खेळत  आहेत आणि आमचं शटल कॉक झालंय. आता हा विचार सर्वांनी केला पाहिजे. शिवसेना हवी की नको याचा विचार करा. मी जिल्हा परिषद निवडणुकीला मी नाही फिरलो. स्थानिक नेते उभे राहावेत म्हणून मी फिरलो नाही. तुम्ही जबाबदारीची धुरा घेणार आहात की नाही? तुम्ही आमदार आहात, खासदार आहात. करा नेतृत्व. लढवा निवडणुका, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी बंडखोर खासदारांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

Follow Us
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा