IND vs AUS: ‘T20 WC मध्ये आता जाडेजाची उणीव जाणवणार नाही’, Wasim Jaffer असं का म्हणाले?

IND vs AUS: वसिम जाफर यांनी टीम इंडियाला एक प्लस पॉइंट दाखवून दिलाय, ज्याचा फायदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये होईल.

IND vs AUS: 'T20 WC मध्ये आता जाडेजाची उणीव जाणवणार नाही', Wasim Jaffer असं का म्हणाले?
wasim-ravindraImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 2:00 PM

मुंबई: सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये T20 सीरीज सुरु आहे. काल दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. तीन टी 20 सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. मागच्या दोन सामन्यात एक गोलंदाजाने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. त्याने प्रभावी मारा करुन ऑस्ट्रेलियन टीमला चांगलच सतावलय. आपल्या कामगिरीने त्याने टीम मॅनेजमेंट आणि क्रिकेटच्या जाणकारांना दखल घ्यायला भाग पडलय.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलच सतावलय

टीम इंडियाचे अन्य गोलंदाज अपयशी ठरले. पण त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. प्रभावी कामगिरी करणाऱ्या या खेळाडूच नाव आहे अक्षर पटेल. आपल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलच सतावलय. मागच्या दोन सामन्यात त्याने पाच विकेट घेतले आहेत. मिळालेल्या संधीच त्याने सोन केलय.

जाडेजाची उणीव जाणवणार नाही

अक्षर पटेलच्या कामगिरीने अनेक माजी क्रिकेटपटूही प्रभावित झालेत. वसिम जाफर यापैकी एक आहेत. अक्षर पटेलमुळे T20 वर्ल्ड कपमध्ये गोलंदाज म्हणून रवींद्र जाडेजाची उणीव जाणवणार नाही, असं वसिम जाफर यांच मत आहे.

टीम मॅनेजमेंटला निराश केलेलं नाही

आशिय कप टुर्नामेंटच्यावेळी रवींद्र जाडेजाला गुडघ्याची गंभीर दुखापत झाली. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेल एक चांगला पर्याय आहे. अक्षर पटेलने टीम मॅनेजमेंटला निराश केलेलं नाही. आशिया कपमध्ये त्याला फार संधी मिळाली नव्हती. मागच्या दोन सामन्यात त्याने फक्त विकेटच काढले नाहीत, तर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला लगाम घातली.

आर्म बॉल चांगला टाकतो

अक्षर पटेल आर्म बॉल चांगला टाकतो. विकेट टू विकेट गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. एलबीडब्ल्यू किंवा बोल्ड करुन त्याने विकेट काढलेत. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली पाहिजे, असं वसिम जाफर यांचं मत आहे. ऑस्ट्रेलियात मैदानं खूप मोठी आहेत. बॉलर्सला सुद्धा मदत मिळू शकते. पटेलकडे पावरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. जाफर यांच्या दृष्टीने ती एक सकारात्मक बाब आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.