AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माची स्फोटक खेळी, ठोकले T20 विश्वचषकातील सर्वाधिक रन

रोहित शर्माने आज आपल्या खेळीने सर्वांचेच मन जिंकले आहे. त्याने फक्त ४२ बॉलमध्ये ९२ रनची तुफानी खेळी केली आहे. त्याच्या फटकेबाजी पुढे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले होते. त्याच्याकडे सर्वात जलद शतक ठोकण्याची संधी होती. पण ती हुकली.

रोहित शर्माची स्फोटक खेळी, ठोकले T20 विश्वचषकातील सर्वाधिक रन
| Updated on: Jun 24, 2024 | 9:47 PM
Share

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे T20 विश्वचषक 2024 मध्ये शतक ८ रनने हुकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात रोहितने गोलंदाजांना जोरदार धुतले. सलामीवीर म्हणून फलंदाजीला आलेल्या रोहितने त्याच्या कारकिर्दीतले सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने रोहितला बोल्ड केले. मात्र, आऊट होण्यापूर्वी रोहितने गोलंदाजांवर चांगलेच तुटून पडले होते.

रोहितची विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या

ऑस्ट्रेलिया विरोधात रोहित शर्माने ९२ धावांची खेळी केलीये. रोहितने 41 बॉलमध्ये 7 फोर आणि 8 सिक्स मारले. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील रोहितची ही सर्वात मोठी खेळी आहे. यापूर्वी त्याने 2010 मध्ये ब्रिजटाऊन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 79 धावांची नाबाद खेळी खेळली होती. टी-20 विश्वचषकातील कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही दुसरी सर्वोच्च खेळी आहे. सुरेश रैनाच्या नावावर शतक आहे.

रोहित शर्माची T20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या

  • ९२ वि ऑस्ट्रेलिया ग्रोस, आयलेट (२०२४)
  • ७९* वि ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाउन (२०१०)
  • ७४ वि अफगाणिस्तान, अबु धाबी (२०२१)
  • ६२* वि वेस्ट इंडीज, मीरपूर (२०१४)

T20 विश्वचषकातील भारतासाठी सर्वात मोठी खेळी

  • 101 सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका ग्रॉस, इस्लेटा (2010)
  • 92 रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया ग्रॉस, आयलेट (2024)
  • 89* विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज, वानखेडे (2016)
  • ८२* विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली (२०२२)
  • 82* विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न (2022)

शतक हुकले

या डावात रोहित शर्माला T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावण्याची संधी देखील होती. ख्रिस गेलने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 47 चेंडूत शतक झळकावले होते. रोहितकडे त्याचा विक्रम मोडण्याची संधी होती. पण वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रोहित शर्माच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतके आहेत. याआधी तो आयर्लंडविरुद्ध ९७ धावांवर बाद झाला होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.