
आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यात पाकिस्तानला दोन वेळा पराभवाची धूळ चारली आहे. आता तिसऱ्यांदा आणि अंतिम फेरीत भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 28 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. मात्र क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे भारतीय संघाला सावध राहणं गरजेचं आहे. तसेच पाकिस्तानला तिसऱ्यांदा धूळ चारत जेतेपद मिळवायचा आहे. दरम्यान, या सामन्यासाठी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी स्वत:च भीती व्यक्त केली आहे. भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी रणनिती असणार आहे, याचा खुलासा केला आहे. तसेच पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांवर कसे भारी पडतील याचीही व्यूहरचना आखली जात आहे.
पाकिस्तानने सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं. यानंतर पाकिस्तानचे हेड कोच माइक हेसन यांनी भारताविरूद्धच्या अंतिम सामन्याबाबत मोठं विधान केलं. माइक हेसन म्हणाले की, ‘माझा मेसेज फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा आहे आणि आम्ही तेच करत आहोत. या गोष्टी मिडिया माझ्यापेक्षा जास्त जाणते. मी क्रिकेटशी निगडीत काम करत आहे. जिथपर्यंत हावभावाचा प्रश्न आहे. हायप्रेशर सामन्यात कायम आक्रमता दिसते, हो ना? आमचं ल फक्त खेळ खेळण्यावर असेल.’
भारतीय संघ पाकिस्तानच्या वरचढ आहे.पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयासाठी धावांचं आव्हान दिलं आणि रोखलंही. त्यामुळे धावांचा पाठलाग असो की धावा रोखणं टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे. त्यामुळे भारतीय संघ पूर्ण ताकदीने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत उतरेल. भारतीय संघाने अंतिम सामना जिंकला तर ही जेतेपदाची नववी वेळ असेल. दुसरीकडे, सुपर 4 फेरीतील भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ काही खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. त्यामळे प्लेइंग 11 बाबतही उत्सुकता आहे. दरम्यान, या स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोण बाजी मारते याकडे लक्ष लागून आहे.