AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट! पाकिस्तानातून धमकी मिळाल्यानंतर आयसीसीची धावपळ

आयपीएल 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तरित्या आयोजित केली आहे. मात्र तयारी जोरात असताना दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे आयसीसीसह सरकारचे धाबे दणाणले आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट! पाकिस्तानातून धमकी मिळाल्यानंतर आयसीसीची धावपळ
| Updated on: May 06, 2024 | 3:38 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. या स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान वेस्ट इंडिजमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी ही पाकिस्तानातून आली आहे. त्यामुळे आयसीसीची धावपळ उडाली आहे. आयसीसीने सांगितलं की, “आम्ही यजमान देश आणि शहरातील अधिकाऱ्यांससोबत एकत्र येत काम करतो. स्पर्धेत कोणतंही विघ्न येणार नाही याची योग्य खात्री करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवर सतत निरीक्षण आणि मूल्यांकन करतो.”

त्रिनिदादचे पंतप्रधान कीथ रोले यांनी डेली एक्स्प्रेसला सांगितलं की, “आम्ही हे संकट ओळखून अतिरिक्त सुरक्षा पुरवू. 21 व्या शतकातील ही दुर्दैवी बाब आहे की, दहशतवादाचं संकट वेगवेगळ्या स्वरुपात घर करून आहे. ” वेस्ट इंडिजमध्ये साखळी फेरीतील काही सामने, सुपर आठ फेरी, सेमीफायनल आणि फायनल खेळली जाईल. पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी 20 संघ सहभागी होणार आहेत. यात पाकिस्तानचा संघही आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला सामना होणार आहे. नुकतंच पाकिस्तान संघाने जेतेपद मिळवण्यासाठी आर्मी कॅम्पमध्ये सराव केला होता. दुसरीकडे, चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन 2025 मध्ये पाकिस्तानात होणार आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या आयएस खोरासान या दहशतवादी संघटनेने टी20 वर्ल्डकपदरम्यान दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. प्रो-इस्लामिक स्टेट मीडियाने अनेक देशांमध्ये क्रीडा स्पर्धांदरम्यान हिंसाचाराची धमकी दिली आहे.आयएस खोरासानच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेने नसीर-ए-पाकिस्तान या प्रचार चॅनलद्वारे एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.

वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्डकप सामने एंटिगुआ,बारबुडा, बारबाडोस, गुयाना, सेंट लूसिया, सेंट विंसेंट, ग्रेनेडाइंस, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये आहेत. तर अमेरिकेच्या फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि टेक्सास शहरांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेत आयोजित सामन्यांवर कोणतंही सावट नाही. टी20 वर्ल्डकप दोन्ही सेमीफायनल त्रिनिदाद आणि गुयाना येथे होणार आहे. तर फायनल बारबाडोसमध्ये होणार आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.