Mumbai Indians : एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची मुंबई इंडियन्सशी नाळ, कोणते आहेत ते खेळाडू जाणून घ्या…

| Updated on: Jul 03, 2022 | 12:32 PM

किरॉन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे आणि जसप्रीत बुमराह देखील बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. अशा परिस्थितीत, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ देखील सर्वात भाग्यवान संघ आहे असे म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे चारही खेळाडू कधी ना कधी मुंबई इंडियन्सचा भाग राहिले आहेत. बुमराह अजूनही एमआयचा एक भाग आहे.

Mumbai Indians : एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची मुंबई इंडियन्सशी नाळ, कोणते आहेत ते खेळाडू जाणून घ्या...
एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची मुंबई इंडियन्सशी नाळ
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Internation Cricket) तीन फॉरमॅट खेळलं जातं. तुम्हाला माहिती असले की यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा (Cricket) समावेश आहे. हे आपण जाणतो. क्रिकेटप्रेमी या तिन्ही फॉरमेटच्या सामन्यांकडे लक्ष देऊन असतात.  तिन्ही फॉरमॅटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारे खेळाडू मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळले आहेत. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, होय. हे खरं आहे की एकदिवसीय टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामन्यांमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू मुंबई इंडियन्सचा भाग आहेत. या खेळाडूंची मुंबई इंडियंन्ससोबत नाळ जोडली आहे. मुंबई इंडियन्ससोबत जोडलेल्या गेलेल्या या खेळाडूंविषी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंविषयी आता आपण बोलूया. हर्शल गिब्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सलग 6 षटकार मारत 36 धावा केल्या होत्या. गिब्सनं 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात नेदरलँड्सच्या डॉन व्हॅन बुंगेविरुद्ध 6 षटकार ठोकले होते. त्याचबरोबर युवराजनं 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध 6 षटकार ठोकले होते. किरॉन पोलार्डने गेल्या वर्षी एका T20I सामन्यात धनंजय डी सिल्वाच्या षटकात 6 षटकार ठोकले होते.

बुमराहच्या एका षटकात 35 धावा

एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 36 धावा, तर कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहनं एका षटकात 35 धावा केल्या. बुमराहनं स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध 29 धावा केल्या आणि एकूण 6 धावा एक्स्ट्रा म्हणून आल्या. पण तुम्हाला माहीत आहे का की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे चारही खेळाडू कधी ना कधी मुंबई इंडियन्सचा भाग राहिले आहेत. बुमराह अजूनही एमआयचा एक भाग आहे.

हे सुद्धा वाचा

हर्शल गिब्स मुंबई इंडियन्सचा भाग होता

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका षटकात 36 धावा करणारा हर्शल गिब्स 2012 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. तर टी20 क्रिकेटमध्ये 6 षटकार मारणारा युवराज सिंग 2019 मध्ये मुंबईचा भाग होता. याशिवाय किरॉन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे आणि जसप्रीत बुमराह देखील बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. अशा परिस्थितीत, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ देखील सर्वात भाग्यवान संघ आहे असे म्हणता येईल.