पहिले देश नंतर मी, विराटच्या निस्वार्थपणाचा पाहा VIDEO

| Updated on: Oct 02, 2022 | 11:44 PM

विराटचं देशप्रेम एका व्हिडीओतून समोर आलंय.

पहिले देश नंतर मी, विराटच्या निस्वार्थपणाचा पाहा VIDEO
विराट कोहलीचा निस्वार्थपणा.
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात भारतानं (Team India) विजय मिळवला आहे. पहिले फलंदाजी करताना भारतानं तीन बाद 237 धावा केल्या होत्या. पण, दक्षिण आफ्रिकेला हे टार्गेट पूर्ण करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. यातच विराट कोहली (Virat Kohli) फॉर्म पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादवची त्याला पुरेपूर साथ मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची खिल्ली उडवत या दोघांनी 102 धावांची मोठी भागीदारी केली. यातच विराटचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत राहिला.

टीम इंडियाचा विजय

दिनेश कार्तिकने षटकाच्या पाचव्या चेंडूपूर्वी विराट कोहलीला आपलं अर्धशतक पूर्ण करायचं आहे की, असं विचारलं. यावर विराटनं त्याला लगेच नकार दिला. विराटनं दाखवून दिलं की देश आधी त्यानंतर आपण. हे तरुणांसाठी एक आदर्श उदाहरण बनलंय. शेवटचे दोन चेंडू चांगले ठरले ज्यात दिनेश कार्तिकने षटकार ठोकला.

हा व्हिडीओ पाहा

सर्वोच्च धावसंख्या

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. टी-20 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

सूर्यकुमार जोमात

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सूर्यकुमार सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उजव्या हाताच्या फलंदाजाने अनेक विक्रम केले.

डेकॉकचं अर्धशतक

डी कॉकनं 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर धाव घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. यासाठी त्यानं 39 चेंडूंचा सामना केला.

मिलरचं अर्धशतक

डेव्हिड मिलरनं 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. अर्शदीप सिंगनं ऑफ-स्टंपच्या बाहेर फुल लेन्थ बॉल टाकला. त्यावर मिलरनं दमदार षटकार मारला. पुढच्याच चेंडूवर मिलरने एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केलंय.