Vinod Kambli Arrest & bail: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक आणि सुटका

भारताचा माजी क्रिकेटपटू (Former cricketer) विनोद कांबळीला (Vinod Kambli) आज दुपारी पोलिसांनी अटक (Police arrest) केली होती.

Vinod Kambli Arrest & bail: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक आणि सुटका
Vinod Kambli
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 8:12 PM

मुंबईं: क्रिकेटपेक्षा वादांमुळे विनोद कांबळी (Vinod Kambli) जास्त लक्षात रहातो. विनोद कांबळी आता एका नव्या वादामध्ये सापडला आहे. विनोद कांबळीने त्याच्याच सोसायटीतील रहिवाशांबरोबर वाद घातला. यासाठी वांद्रे पोलिसांनी आज त्याला अटकही (Police arrest) केली होती. विनोद कांबळीसाठी वाद नवीन नाहीयत. या वादांमुळेच त्याचं क्रिकेट करीयर झोकाळून गेलं. उत्तम फलंदाजी करण्याचं तंत्र असूनही विनोद कांबळी दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघाकडून (Indian cricket Team) खेळू शकला नाही. सचिन आणि विनोदच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चिले जातात. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला आज दुपारी वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. विनोद कांबळीवर वांद्र्यातील रहिवाशी सोसायटीच्या गेटला कार धडकवल्याचा आरोप आहे. कांबळी राहत असलेल्या सोसायटीचा हा गेट आहे. पोलिसांनी कांबळीला अटक केली व नंतर त्याला जामिनावर सोडलं.

विनोद कांबळीवर आयपीसीचं कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवण), कलम 336 दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं आणि कलम 427 या कलमांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

गाडी धडकवल्याच्या प्रकारानंतर विनोद कांबळीने संकुलाचा वॉचमन आणि काही रहिवाशांबरोबर वाद घातला. त्याला आधी अटक करण्यात आली. नंतर जामिनावर त्याची सुटका झाली.

मागच्यावर्षी कांबळीने नोंदवली होती तक्रार

मागच्यावर्षी विनोद कांबळीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आपली सायबर फसवणूक झाल्याचा त्याने दावा केला होता. एएनआयच्या वृत्तानुसार, आरोपीने कांबळीची एक लाख रुपयांना फसवणूक केली होती. केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या नावाखाली आरोपीने कांबळीचे बँकेची माहिती मिळवली व त्याला फसवलं.

कांबळीली फोन करणाऱ्या आरोपीने तो एका खासगी बँकेचा अधिकारी असल्याचं भासवलं होतं. त्याने कांबळीकडे त्याच्या बँक खात्याची माहिती मागितली होती. कांबळीने ही माहिती दिल्यानंतर आरोपीने त्याच्या खात्यातून 1.13 लाख रुपये काढले होते. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.