भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा, IPL मध्ये कोहलीला शिकवणारा खेळाडू पाकिस्तानचा कोच होणार?

| Updated on: Oct 28, 2021 | 1:10 PM

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेत खेळत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने भारताला हरवून आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर न्यूझीलंड संघाचाही पराभव केला.

भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा, IPL मध्ये कोहलीला शिकवणारा खेळाडू पाकिस्तानचा कोच होणार?
Pakistan-Cricket-Team
Follow us on

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेत खेळत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने भारताला हरवून आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर न्यूझीलंड संघाचाही पराभव केला. यासह त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, या विश्वचषकानंतर संघात बदल पाहायला मिळू शकतात. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला कायमस्वरूपी मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो. भारताला 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे भारताचे माजी प्रशिक्षकक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) हे पाकिस्तानचे पुढचे प्रशिक्षक असू शकतात. टी-20 विश्वचषकानंतर कर्स्टन पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतात. (Gary Kirsten likely to be new head coach of Pakistan will replace Misbah-ul-Haq Reports)

दुसऱ्या बाजूला कर्स्टन यांच्याशिवाय विराट कोहलीची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे प्रशिक्षक सायमन कॅटिच आणि दोन वेळा इंग्लंडचे प्रशिक्षक राहिलेले पीटर मोरेस यांचीही नावे या शर्यतीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा परदेशी प्रशिक्षक ठेवण्याच्या बाजूने आहेत. कर्स्टन हे यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. 2008 ते 2011 या काळात त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघ कसोटीत नंबर-1 बनला. कर्स्टनने आयपीएलमध्ये आरसीबीसोबतही काम केले आहे आणि त्यावेळी कोहली संघाचा कर्णधार होता.

राजा यांच्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात प्रवेश झाल्यानंतर मिसबाह-उल-हकने विश्वचषकापूर्वी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यानेही आपले पद सोडले. त्यानंतर संघाने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला. सध्या पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक हा संघाचा अंतरिम प्रशिक्षक असून त्याच्या मार्गदर्शनाखाली संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे. विश्वचषकात पाकिस्तानने भारताला कधीही हरवले नव्हते, पण यावेळी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने हा इतिहास बदलून टाकला आहे.

इतर बातम्या

India vs New zealand: झहीर खानचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला, सांगितली न्यूझीलंड संघाची खरी ताकद

India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

VIDEO: एबी डिव्हिलियर्सप्रमाणे शॉट खेळायला गेला आणि बाद झाला, बांग्लादेशच्या खेळाडूची ही विकेट पाहाच!

(Gary Kirsten likely to be new head coach of Pakistan will replace Misbah-ul-Haq Reports)