World Cup 2011 : गौतम गंभीरचा महेंद्रसिंह धोनीवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाला….

| Updated on: Jan 04, 2023 | 5:46 PM

महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) 2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये (World Cup 2011) सिक्स मारत टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन केलं होतं.

World Cup 2011 : गौतम गंभीरचा महेंद्रसिंह धोनीवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाला....
Follow us on

Gautam Gambhir On Dhoni : टीम इंडियाने 2 एप्रिल 2011 ला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने सिक्स मारुन इतिहास रचला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. विनिंग सिक्स मारल्याने धोनीला वर्ल्ड कपचा रियल विनर मानलं गेलं. मात्र वर्ल्ड कपचा रियल हिरो धोनी नसून झहीर खान असल्याचं गंभीरने म्हटलं. (gautam gambhir says zaheer khan is real hero of world cup 2011 not m s dhoni)

धोनीने या फायनलमध्ये 91 धावांची नाबाद खेळी केली होती. तर सिक्स मारत टीम इंडियाला वर्ल्ड कप चॅम्पियन केलं होतं. मात्र गंभीरला धोनी वर्ल्ड कपचा रियल हिरो वाटत नाही.

गंभीर काय म्हणाला?

“लोकं धोनीने मारलेल्या विजयी सिक्साबाबत बोलतात. त्या सामन्यात मी 97 रन्स केल्या होत्या. मात्र झहीर खानने फायनलमध्ये शानदार बॉलिंग करत श्रीलंकेला 274 रन्सवर रोखलं होतं”, असं गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या विशेष कार्यक्रमात बोलला.

हे सुद्धा वाचा

झहीर- गंभीरची निर्णायक कामगिरी

वर्ल्ड कप 2011 मध्ये धोनी व्यतिरिक्त गौतम गंभीर आणि झहीर खानचं या विजयात निर्णायक भूमिका होती. गंभीरने 97 रन्स केल्या होत्या. तर झहीरने श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखून ठेवलं होतं.

त्यानंतर टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. सेहवाग आणि सचिन या दोघांची 31 धावांच्या आतच महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. तर धोनीने 79 बॉलमध्ये 91 रन्सची नाबाद खेळी केली. धोनी-गंभीरने 109 रन्सची पार्टनरशीप केली.