
टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता मुख्य संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर श्रीलंके विरुद्ध टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तिघे श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात या दौऱ्यातून टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. रोहितने टी 20I मधून निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाला या मालिकेतून पूर्ण वेळ कर्णधार मिळणार आहे. तसेच गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंके विरुद्ध नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. त्यामुळे टीम इंडियात एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. अशात आता गौतम गंभीरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. गंभीरने या व्हीडिओतून एक चांगली टीम कशी तयार केली जाऊ शकते, याबाबत म्हटलं. तसेच गंभीर आणखी काय काय म्हणाला हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
मॉर्डन क्रिकेटनुसार खेळण्यासाठी तसे खेळाडू हवेत, जे स्वाभाविकरित्या तसं खेळू शकतील. त्यांनी तसं खेळायला हवंच, यासाठी जबरदस्ती करणं योग्य नसल्याचं गंभीर 2023 मध्ये स्टार स्पोर्ट्ससह बोलताना म्हणाला होता.
तुम्हाला त्या हिशोबाने खेळणाऱ्या खेळाडूचा शोध घेणं गरजेचं आहे. असे खेळाडू हवेत, ज्यांनी नव्या पद्धतीने खेळणं आत्मसात केलं आहे. काही खेळाडू एकाच पद्धतीने खेळू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तसंच खेळायला हवं, यासाठी दबाव टाकण्यात अर्थ नाही. त्यांना आपल्याला अपेक्षित तसं खेळता येत नसावं. त्यामुळे माझ्यासाठी खेळाडूंची ताकद ओळखणं आणि तशी निवड करणं महत्त्वाचं आहे.
गौतम गंभीर काय म्हणालेला?
Why is it important to have a balanced mix of players in a team?
How have rule changes affected selection?📹 | Watch Team India Head Coach, @GautamGambhir, discuss team formation, new approaches, and player identification.#MenInBlue #Cricket pic.twitter.com/bMoiJf08Cm
— Star Sports (@StarSportsIndia)
तसेच वनडे क्रिकेटसाठी सर्व प्रकारचे खेळाडू पाहिजे असतात. इथे एक बाजू लावून धरणारे आणि रनरेट धावता ठेवणारेही खेळाडूही हवेत. योग्य संतुलित टीम या क्रिकेट प्रकारची गरज असल्याचं गंभीरचं मत आहे. सर्वात आधी अशा खेळाडूंची पारख करण्याचं कौशल्य असायला हवं ज्यांच्यात निर्भीड खेळण्याची कुवत असेल, असं गंभीरने नमूद केलं.