AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सने डाव टाकला, आशिष नेहराबाबत घेतला मोठा निर्णय

आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स हा संघ 2022 पासून उतरला आहे. पहिल्या फटक्यात गुजरातने जेतेपदावर नाव कोरलं होतं. तर दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. आयपीएल 2024 स्पर्देत संघाची सुमार कामगिरी राहिली. आता आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी संघात उलथापलथी सुरु आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सने डाव टाकला, आशिष नेहराबाबत घेतला मोठा निर्णय
| Updated on: Sep 26, 2024 | 5:03 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींनी आपल्या संघाची बांधणी सुरु केली आहे. राजस्थान रॉयल्सने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविडच्या खांद्यावर दिली आहे. तर पंजाब किंग्सने रिकी पॉन्टिंगवर विश्वास टाकला आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्स झहीर खानवर डाव लावला आहे. असं असताना गुजरात टायटन्सच्या गोटातही बरंच काही शिजताना दिसत आहे. जानेवारी 2022 मध्ये गुजरात टायटन्सने आशिष नेहराची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सने चांगली कामगिरी केली आहे. पहिल्याच फटक्यात जेतेपदावर नाव कोरलं होतं. तर दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून जेतेपद मिळवलं होतं. तसेच चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाल्याने आयपीएल 2023 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र आयपीएल 2024 स्पर्धेत संघाची कामगिरी सुमार राहिली. गुजरात टायटन्सने 14 पैकी 7 सामन्यात पराभव, 5 सामन्यात विजय, तर दोन सामने पावसामुळे झाले नाहीत. असं असातना सलग चौथ्या वर्षी आशिष नेहरा संघासोबत असेल की नाही याबाबत चर्चा रंगली आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आशिष नेहरा आयपीएल 2025 स्पर्धेतही गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. इतकंच काय तर विक्रम सोलंकीही संघासोबत कायम असणार आहेत. म्हणजेच या पर्वात संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काही बदल होणार नाही. आशीष कपूर, मिथुन मनहास, नरेंद्र नेगी आणि नईम अमीन संघासोबत कायम राहतील. पण गॅरी कर्स्टनची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. गॅरी कर्स्टनने सध्या पाकिस्तान संघाच्या मर्यादीत षटकाच्या संघाचा प्रशिक्षक आहे. गॅरी कर्स्टन मागच्या तीन पर्वात गुजरातचा फलंदाज प्रशिक्षक होता आणि मार्गदर्शक म्हणून काम केलं होतं.

दरम्यान, आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वी किती खेळाडू रिटेन करायचे हा प्रश्न सोडवायचा आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून विकल्यानंतर गेल्या पर्वात सर्वच गणित बिघडलं. कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आली. मात्र त्याच्या नेतृत्वात काही खास करता आलं नाही. गुजरात टायटन्सला आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

Follow Us
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश