
आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान हार्दिक पांड्या या ना त्या कारणाने चर्चेत राहिला. कधी कर्णधारपदावरून, कधी मैदानातील निर्णयामुळे चर्चेत राहिला. आता स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर हार्दिक पांड्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याच्या आयुष्यात सर्व काही ठिक नसल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्यात बिनसल्याचं चर्चा रंगली आहे. असं असताना दोघांकडून याबाबत कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. येणाऱ्या बातम्यांवर हार्दिकने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर नताशा मात्र कोड्यात बोलून किंवा पोस्ट टाकून आणखी संभ्रम वाढवत आहे. असं असताना दीड महिन्यापूर्वीच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ आयपीएल स्पर्धेदरम्यानचा आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमात पांड्या कुटुंबिय एकत्र आलं होतं. यात हार्दिक पांड्या, पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य दिसत आहे. कौटुंबिक कार्यक्रमात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. इतकंच काय तर हार्दिकची पत्नी नताशा तितकी जोशात दिसत आहे. त्यामुळे या दीड महिन्यात असं काय झालं की वेगळं होणार असल्याचं चर्चांना उधाण आलं आहे.
हार्दिक पांड्याने दीड महिन्यापूर्वी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत हार्दिक आपल्या भावासोबत देवाचा जयघोष करताना दिसत आहे. हार्दिक आणि कृणाल यांच्या जुगलबंदी रंगल्याचं दिसून येत आहे. ‘हरे राम-हरे कृष्ण’च्या जयघोषात दोघं भाऊ दंग झाल्याचं दिसत आहे. हार्दिक पांड्या यावेळी खूपच जोशात होता आणि हातात माईक जोरजोरात भजन गात होता. दुसरीकडे, हार्दिकच्या मुलगा अगस्त्यला कुटुंबातील सदस्य प्रेमाने कुरवाळत आहेत. तसचे पत्नी नताशा स्टॅन्कोविक या कार्यक्रमात बसली असून ती सुद्धा आनंद घेत आहे. या कार्यक्रमाचा आनंद लुटत असताना तिच्या चेहऱ्यावर कोणतंच टेन्शन दिसत नाही. उलट मुलगा अगस्त्यच्या मस्तीखोरपणा पाहून आनंदी होत असल्याचं दिसत आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक जोपर्यंत समोरून या बातम्यांवर स्पष्टपणे सांगत नाहीत, तोपर्यंत या बातम्यांबाबत संशय असणार आहे. त्यांच्यातील नात्यात खरंच काही वितुष्ट आलं आहे का हे आता दोघांपैकी एक जण सांगू शकतो. तिथपर्यंत सोशल मीडियावर फक्त चर्चा आणि जो तो आपल्या पद्धतीने या नात्याचं विश्लेषण करताना दिसेल. दरम्यान हार्दिक पांड्या टी20 वर्ल्डकप संघात आहे. टी20 वर्ल्डकप संघाचं उपकर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.