AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्या या ब्रिटीश गायिकेला करतोय डेट? कोण आहे जस्मिन वालिया

भारतीय क्रिकेटर नेहमीच्या चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या खेळामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. नेटकरी त्यांच्या प्रोफाईलवर लक्ष ठेवून असतात. असाच चर्चेत राहणार हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या कारणामुळे चर्चेत राहिला. आता तो कोणाला डेट करतोय याबद्दल ही लोकांना जाणून घ्यायचे आहे.

हार्दिक पांड्या या ब्रिटीश गायिकेला करतोय डेट? कोण आहे जस्मिन वालिया
| Updated on: Aug 14, 2024 | 5:57 PM
Share

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत घटस्फोटाच्या कारणांमुळे चर्चेत होता. दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. अखेर दोघांनी सोशल मीडियावर या बातमीला दुजोरा दिला. दोघेही आता वेगळे झाले असून नताशा तिच्या देशात परतली आहे. दोघांना एक मुलगा देखील आहे. जो सध्या नताशा सोबत राहत आहे. ‘आयपीएल 2024’ साठी ‘मुंबई इंडियन्स’चा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे नाव घोषित करण्यात आले होते. तेव्हा त्याची पत्नी कोणत्याही आयपीएल सामन्यात दिसली नाही तेव्हा दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. अखेर ‘T20 वर्ल्ड कप’नंतर वेगळे होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, आता हार्दिकच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने प्रवेश केल्याचे दिसत आहे.

30 वर्षीय भारतीय क्रिकेटर सध्या ग्रीसमध्ये सुट्टी घालवत आहे, त्याचे व्हेकेशन फोटोज समोर आले आहेत. ब्रिटीश गायिका जस्मिन वालिया देखील त्या ठिकाणी आहे. अशा परिस्थितीत, हे फोटो पाहून, नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला आहे की कदाचित हार्दिक आणि जस्मिन एकमेकांना डेट करत आहेत.

ब्रिटीश गायिका आणि जस्मिन वालिया हिचा जन्म इंग्लंडमधील एसेक्स येथे झालाय. तिचे आई-वडील भारतीय वंशाचे होते. जस्मिनला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. तिने काही वर्षे नॅटवेस्ट बँकेत ग्राहक सल्लागार म्हणून काम केलंय. जस्मिन वालिया हिला  ‘द ओन्ली वे इन एसेक्स’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये तिने 2010 मध्ये पहिल्यांदा काम केले होते. 2014 मध्ये, जस्मिनने स्वतःचे YouTube चॅनल सुरू केले.

2015 मध्ये जस्मिन ब्रिटिश टीव्ही शो ‘देसी रास्कल्स 2’ मध्ये दिसली होती. 2017 मध्ये, जस्मिनने तिचे ‘बॉम डिग्गी’ गाणे रिलीज केले, जे 2018 च्या बॉलिवूड चित्रपट ‘सोनू के टीटू की स्वीटी’ च्या साउंडट्रॅकसाठी रिमेक केले गेले. तिने ‘बिग बॉस 13’ फेम असीम रियाझसोबत ‘नाइट्स अँड फाईट्स’मध्ये काम केले.

हार्दिक आणि जस्मिनच्या डेटिंग अफवांबद्दल पसरत आहेत. ब्रिटीश गायक ही हार्दिकला इन्स्टा वर फॉलो करते आणि क्रिकेटर हार्दिक देखील जस्मिनच्या अनेक इन्स्टा पोस्ट ला लाईक करत असतो.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.