आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न

आशिया कप स्पर्धेत वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीवरून आता वाद पेटला आहे. माजी क्रिकेटपटू आणि वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या..

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 20, 2025 | 6:07 PM

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत काही नावांवरून आता चर्चांना उधाण आलं आहे. या संघात हर्षित राणाला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. माजी क्रिकेटपटू आणि 1983 वर्ल्डकप विजेत्या संघात असलेल्या के श्रीकांत यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हार्षित राणा संघात कसा आला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या निवडीमुळे के श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये हर्षित राणाची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे त्याची निवड करून काय संदेश द्यायचा आहे? हर्षित राणाऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळायला हवं होतं, असं मत के श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे.

श्रीकांत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हणाले की, ‘हर्षित राणा कुठून आला? आयपीएलमध्ये त्याची कामगिरी खूपच खराबहोती. त्याच्या इकोनॉमी रेट प्रति ओव्हर हा 10 पेक्षा जास्त होता. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना तुम्ही काय संदेश देत आहात?’ दुसरीकडे, शिवम दुबे ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं. श्रीकांत म्हणाला की, ‘ते तिलक वर्माला सहावा गोलंदाज ठेवतील किंवा अभिषेक शर्मा किंवा शिबम दुबे.. त्यांनी आयपीएलमध्ये क्वचितच गोलंदाजी केली असेल. जर तुम्हाला जर असा खेळाडू पाहीजे की जो आठव्या क्रमांकावर फलंदाजीसह गोलंदाजी करेल तर तो वॉशिंग्टन सुंदर आहे. शिवम दुबेचा नंबर कुठूनही योग्य वाटत नाही.’

आशिया कप स्पर्धेत श्रेयस अय्यरची नियुक्ती न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाललाही संघात स्थान मिळालं नाही. या दोन्ही फलंदाजांनी टी20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण असं असूनही त्यांना संघात स्थान मिळालं नाही. दुसरीकडे, शुबमन गिलची संघात एन्ट्री झाली असून त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे.