
नवी दिल्ली : संघात दमदार फलंदाजीसह गोरंदाजी करणारे खेळाडू असतील तर तुमचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. हे अनेकदा पहायलाही मिळतं. पण, यातही अपवाद असतातच. पण, शेवटच्या षटकात तुम्ही जर सलग षटकार मारत असला तर चर्चा होणारच. असं ऑस्ट्रेलिया संघात झालंय. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (Australia Cricket Team) सध्या महिला टी20 (T20) आणि एकदिवसीय विश्वविजेता आहे. याचं कारण संघातील सामने विजेते खेळाडू आहे. त्यापैकी एक म्हणजे ताहलिया मॅकग्रा (Tahlia Mcgrath) हिनं असंच काहीसं केलंय.
स्फोटक फलंदाज मॅकग्रानं आपल्या छोट्या कारकिर्दीत जोरदार कामगिरी केलीय. तिनं ऑस्ट्रेलियासाठी सामने जिंकले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियन संघ खेळत नाही. त्यामुळे मॅकग्रा देशांतर्गत स्पर्धेत भाग घेत आहे. तिनं एका सामन्यात रोमांचक पद्धतीनं षटकारांची हॅट्ट्रिक केलीय. या तिच्या कामगिरीमुळे ती सध्या चर्चेत आहे.
Here’s why Tahlia McGrath is one of the best finishers in the world!
15 runs required from the final over, McGrath on 93. Then this happened ? #WNCL pic.twitter.com/G1Dat30FT6
— cricket.com.au (@cricketcomau) September 23, 2022
महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग ही महिलांची एकदिवसीय स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झाली. पहिल्याच दिवशी व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. ऑस्ट्रेलियाकडे दोन्ही संघात दोन उत्कृष्ट खेळाडू होते. व्हिक्टोरियाची खेळाडू अॅलिस पॅरीनं 117 धावा केल्या आणि तिच्यासोबत 20 वर्षीय अॅनाबेल सदरलँडनेही 110 धावा केल्या. याच्या जोरावर व्हिक्टोरियानं 264 धावा केल्या.
मॅकग्राने उत्कृष्ट खेळी खेळली आहे. यात तिला इतर फलंदाजांचीही फारशी साथ मिळाली नाही. असं असूनही सामना दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या आवाक्याबाहेर दिसत होता. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. मॅकग्रा 93 धावांवर खेळत असून शतकापासून 7 धावा दूर होती. यातच तिनं धडाकेबाज फलंदाजी करत तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलंय. शिवाय संघाला विजय मिळवून दिला.
मॅकग्राने सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. तिनं 111 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या. यातही शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार खेचले. दक्षिण ऑस्ट्रेलियाने हा सामना ३ गडी राखून जिंकला आणि स्पर्धेत दमदार सुरुवात केली.