MS dhoni : पाकिस्तानला हरवणारा निडर कॅप्टन म्हणाला, ‘मी धोनीची ती गोष्ट शिकलोय’!

| Updated on: Jun 06, 2023 | 12:35 AM

सुलतान ऑफ जोहोर कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सडन डेथमध्ये केलेल गोल ते पाकिस्तानला हरवून ज्युनियर आशिया कप जिंकणारा निडर कप्तान उत्तम सिंगने आपने धोनीची ती एक गोष्ट शिकलो असल्याचं सांगितलं.     

MS dhoni : पाकिस्तानला हरवणारा निडर कॅप्टन म्हणाला, मी धोनीची ती गोष्ट शिकलोय!
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी ओळखला जातो,  जगभर त्याचे फॅन आहेत. फक्त क्रिकेटच नाहीतर क्रिकेट सोडून दुसरा खेळ खेळणारे खेळाडूही धोनीचे फॅन असलेले पाहायला मिळतात. भारतीय ज्युनियर हॉकी संघाचा कर्णधार उत्तम सिंगहा सुद्ध धोनीचा खूप मोठा चाहता आहे. सुलतान ऑफ जोहोर कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सडन डेथमध्ये केलेल गोल ते पाकिस्तानला हरवून ज्युनियर आशिया कप जिंकणारा निडर कप्तान उत्तम सिंगने आपने धोनीची ती एक गोष्ट शिकलो असल्याचं सांगितलं.

हॉकीसोडून मी महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा चाहता आहे. 400 धावांचे लक्ष्य किंवा 100 धावाचं लक्ष्य करून जिंकणं, त्याच्या चेहऱ्यावर कधीच भीती किंवा दबाव दिसत नाही. अटीतचीच्या लढतीत एकवेळ पाहणारे प्रेक्षक काळजीत पडलेले दिसतात. मात्र धोनी त्याच्यावरील दबाव चेहऱ्यावरील दबाव कधीच दाखवून देत नाही. त्यामुळे विरोधी संघाला काही अंदाज बांधणं अवघड जातं, असं उत्तम सिंगने सांगितंलं.

आमची मॅच असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल फायनल लाईव्ह पाहता आली नाही. चेन्नई जिंकल्याच समजल्यावर आनंद झाल्याचं उत्तम सिंग म्हणाला. उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील कर्मापूर गावातून आलेल्या उत्तम वरिष्ठ संघाकडूनही त्याने सात सामने खेळले आहेत. उत्तमच्या वडिलांना हॉकी खेळण्याची आवड होती, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना आपलं स्पप्न काही पूर्ण करत आलं नाही. अधुरे स्वप्न त्यांचा पोटचा पोरगा देशासाठी चमकदार कामगिरी करताना पाहून त्यांना अभिमान वाटतो.

दरम्यान, उत्तम सिंगवरून लक्षात येत असेल की धोनी अशा किती उत्तम सिंगचा रोल मॉडेल असेल. त्यामुळे चाहते त्याची मोठी खेळी नाहीतर त्याला पाहण्यासाठी मैदानात इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. धोनीनेही चाहत्यांच्या प्रेमाला तडा न जाता यंदा सीएसकेसाठी आयपीएलची ट्रॉफी जिंकून दाखवली.