IPL 2023 : महेंद्र सिंग धोनीच्या खास भिडूला लागली लॉटरी, थेट कर्णधारपद झाली निवड!

सीएसके खेळाडूला बॅक करणारी टीम म्हणून ओळखली जाते. अशाच बॅक केलेल्या खेळाडूंपैकी मराठमोळा खेळाडू ऋुतुराज गायकवाड आहे. गड्याने मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं. आता याच युवा खेळाडूला थेट कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे.

IPL 2023 : महेंद्र सिंग धोनीच्या खास भिडूला लागली लॉटरी, थेट कर्णधारपद झाली निवड!
MS dhoni Image Credit source: ipl
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:00 PM

मुंबई : यंदाच्या पर्वात आयपीएल 2023 मध्ये खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सीएसकेने पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास केला. तसं पाहिलं तर माजी कर्णधर महेंद्रसिंग धोनी यांनी युवा खेळाडूंच्या जोरावर ट्रॉफी जिंकली. गोलंदाजीमध्ये सीएसकेकडे एकही मोठं नाव असलेला बॉलर नव्हता. मात्र धोनीने याआधीही हा करिष्मा करून दाखवला आहे. सीएसके खेळाडूला बॅक करणारी टीम म्हणून ओळखली जाते. अशाच बॅक केलेल्या खेळाडूंपैकी मराठमोळा खेळाडू ऋुतुराज गायकवाड आहे. गड्याने मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं. आता याच युवा खेळाडूला थेट कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे.

महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील सहभागी होणाऱ्या 6 संघांपैकी एक संघाने त्याला आपल्या संघाचं कर्णधारपद केलं आहे. 15 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सर्व सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या पाठिंब्याने  झालेल्या T20 फ्रँचायझी लीगमध्ये पुणे फ्रँचायझीला विक्रमी 14.80 कोटी रुपये मिळाले. पुण्यानेच ऋतुराज गायकवाडवर आयकॉन खेळाडू म्हणून बोली लावली होती. त्याला या फ्रँचायझीचा कर्णधारपदही देण्यात आलं आहे.

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याचबरोबर यंदाच्या मोसमातही त्याने महत्त्वाच्या खेळी केल्या. ऋतुराज गायकवाडने IPL 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 590 धावा केल्या आहेत ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय गायकवाडने टीम इंडियासाठी 1 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील स्टँडबाय खेळाडूंपैकी एक म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली होती. मात्र 4 जून रोजी लग्न झाल्यामुळे त्याने आपलं नाव मागं घेतलं आहे. महाराष्ट्राची महिला क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्नबंधनात अडकला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.