सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा खेळ 2 धावांवर कसा आटोपला? अर्शदीप सिंगने केला मोठा खुलासा

अर्शदीप सिंगने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त 2 धावांवर रोखलं. यासाठी खास प्लान आखला होता. याबाबतचा खुलासा त्याने केला. तसेच हा प्लान प्रत्यक्षात आला. नेमकं काय बोलला अर्शदीप सिंग ते जाणून घ्या.

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा खेळ 2 धावांवर कसा आटोपला? अर्शदीप सिंगने केला मोठा खुलासा
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा खेळ 2 धावांवर कसा आटोपला? अर्शदीप सिंगने केला मोठा खुलासा
Image Credit source: ACC
| Updated on: Sep 27, 2025 | 7:00 PM

आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात भारताने 202 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकेचा संघ 202 धावा करू शकला आणि सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा डाव अवघ्या 2 धावांवर आटोपला. भारतासमोर फक्त 3 धावांचं आव्हान होतं भारताने हे आव्हान पहिल्याच चेंडूवर पूर्ण केलं. यासह भारताने आशिया कप स्पर्धेत सहावा सामना जिंकत विजयी षटकार मारला. श्रीलंकेचा पथुम निसंका आणि कुसल परेरा यांनी अर्शदीपच्या दोन षटकात 26 धावा काढल्या होत्या. त्यानंतर त्याने कमबॅक केलं. इतकं काय तर सुपर ओव्हरमध्ये 2 धावांवर रोखलं. अर्शदीप सिंगने सुपर ओव्हरमधील विजयाचं गणित कसं जुळलं ते सांगितलं.

बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात अर्शदीप सिंगने सुपर ओव्हरचं गणित सांगितलं. ‘मी विचार करत होतो की पॉवर प्लेमध्ये आमच्या विरुद्ध दावा काढल्या. पण नंतर सर्वांना योगदान दिलं. सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचून नेला. सुपर ओव्हरमध्ये माझी योजना स्पष्ट होती की वाइड यॉर्कर टाकायचा. तसेच श्रीलंकन फलंदाजांना फक्त ऑफ साइडला धावा करण्याची संधी द्यायची.’ अर्शदीप सिंगची ही रणनिती कामी आली. कारण कुसल परेरा डीप पॉइंटवर रिंकु सिंह हाती झेल देऊन बसला. तर शनाका डीप बॅकवर्ड पॉइंटला जितेश शर्माच्या हाती झेल देऊन बाद झाला.

आशिया कप स्पर्धेत अर्शदीप सिंगने फक्त दोन सामने खेळले. पण असं असूनही त्याला याबाबत नैराश्य वाटत नाही. दुबईच्या खेळपट्टीच्या परिस्थितीमुळे भारत जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्यासोबत खेळला. ‘मी नेहमीच स्वत:ला मानसिकदृष्ट्या तयार ठेवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुम्हाला वाटलं पाहीजे की तुम्ही 100 टक्के दिले आहे. जेव्हा खेळत नसता तेव्हा मैदानाबाहेर 100 टक्के दिले पाहीजे. खेळणाऱ्या खेळाडूंची काळजी घेतली पाहीजे. चांगले प्रशिक्षण घेतलं पाहीजे. फिटनेसवर काम केलं पाहीजे.’, असं अर्शदीप सिंग म्हणाला.