IND vs PAK Final: भारतच जिंकणार आशिया कप! 28 तारीख आणि पाकिस्तानचा 36 चा आकडा
आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे.

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. या स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघांचा सामना होणार आहे. तर आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होईल. गेल्या 16 पर्वात कट्टर प्रतिस्पर्धी कधीही अंतिम फेरीत एकमेकांशी खेळलेले नाहीत. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे. 28 सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात हे दोन संघ भिडणार आहे. भारतीय संघ नवव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यास सज्ज आहे. दुसरीकडे, 28 तारखेचा आकडा पाहून पाकिस्तानला घाम फुटला आहे. कारण यापूर्वी 28 तारखेला खेळलेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानची धाकधूक आतापासूनच वाढली आहे.
दोन्ही संघ यापूर्वी 28 डिसेंबर 2012 रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा दोन्ही संघ टी20 सामा खेळले होते. तेव्हा भारताने या सामन्यात पाकिस्तानला 11 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंक आशिया कपच्या 2022 मध्ये टी20 सामन्यात 28 ऑगस्टला आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानवर 4 गडी राखून विजय मिळवला होता. दोन्ही विजयामुळे भारतीय फॅन्सच्या मते ही तारीख शुभ मानली जात आहे. आता 28 सप्टेंबर 2025 ला अंतिम सामना होणार आहे. आता या शुभ तारखेची जादू कायम राहते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, आशिया कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीवर ग्रहांचा प्रभाव पडणार आहे. हा सामना अतितटीचा होईल असं ज्योतिष सांगत आहेत. पण टीम इंडियावर ग्रहांचा अनुकूल परिणाम होताना दिसत आहे. भारत शेवटी जिंकेल अशी अपेक्षा आहे. कारण गुरु आणि मंगळाची स्थिती भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल.
भारताने आशिया कप स्पर्धेत नऊ वेळा जेतेपद मिळवलं आहे. 1984, 1988, 1990-91, 1995, 20210, 2016, 2018, 2023 साली जेतेपद जिंकलं. तर पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पाकिस्तानने 2000 आणि 2012 साली विजय मिळवला आहे. त्यामुळे या स्पर्धेतही भारताचं पारडं जड आहे. इतकंच काय भारताने पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीतही पराभवाची धूळ चारली आहे. आता तिसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.
