Virat Kohli: विराट कोहलीच्या शूजची किंमत किती? One8 ब्रँडेड बूट किती महाग? पाकिस्तान क्रिकेटपटूही त्याच्या प्रेमात
Virat Kohli brand One8 shoes: दुबईतील महिला आशिया कपमध्ये पाकिस्तान टीमच्या एक नाही तर अनेक महिला खेळाडू विराट कोहलीचा ब्रँड One8 ks हे शूज घालून खेळताना दिसत आहेत. किती आहे त्यांची किंमत?

विराट कोहली हा केवळ स्फोटक फलंदाज नाही तर एक स्मार्ट उद्योजकही ठरला आहे. त्याचा शूज ब्रँड One8 ची अजून एक नवीन सीरीज लाँच झाली आहे. त्याला भारतातून मोठा प्रतिसाद मिळाला. पण आता विराटच्या या बुटाच्या ब्रँडची क्रेझ परदेशातही आहे. प्रतिस्पर्धी पाकिस्तानमध्ये सुद्धा या शूजला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. दुबईतील महिला आशिया कपमध्ये पाकिस्तान टीमच्या एक नाही तर अनेक महिला खेळाडू विराट कोहलीचा ब्रँड One8 ks हे शूज घालून खेळताना दिसत आहेत. किती आहे या बुटाची किंमत?
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
महिला आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँग दरम्यान नुकताच सामना झाला. यामध्ये पाकिस्तान महिला खेळाडूंच्या पायातील बुटांकडे सर्वांचे लक्ष गेले. काही बातम्यानुसार, नाशरा संधू, ऐमान फातिमासह अनेक खेळाडूंच्या पायात One8 हा बुट दिसला. त्यामुळे विराट कोहली याच्या शूज ब्रँडची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येते.
नाशरा संधूची दमदार कामगिरी
नाशरा संधू हिच्या One8 या शूजची झलक सोशल मीडियावर दिसली. तिने हाँगकाँगविरोधात कमाल गोलंदाजी केली. नाशरा संधू हिने हाँगकाँगविरोधातील सामन्यात चार षटकात केवळ 7 धावा देऊन 6 गड्यांना बाद केले. तिच्या करिअरमधील ही सर्वात दमदार कामगिरी होती. पाकिस्तानकडून टी-20 क्रिकेटमध्ये सहा विकेट घेणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. नाशरा हिच्या घातक गोलंदाजीपुढे हाँगकाँगचा संपूर्ण संघ केवळ 71 धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानने हा सामना खिशात घालत उपांत्य फेरीत धडक दिली.
विराट कोहलीच्या बुटाची किंमत किती?
आता व्हायरल छायाचित्रानुसार आणि व्हिडिओनुसार पाकिस्तानी महिला क्रिकेटर्सने Cover Drive 18 Pro हा या ब्रँडचा बुट घातला आहे. One8 च्या साईटनुसार, शूजची भारतीय चलनातील किंमत 13,999 रुपये आहे. हे बुट जर्सी व्हाईट सोनिक ब्लू आणि क्लासिक ब्लॅक या रंगात न्हाऊन निघालेले आहेत. 13,999 रुपयाच्या या बुटाची किंमत पाकिस्तान चलनात 40,954 रुपये इतकी होते. या खेळाडूंनी हे शूज जवळपास
41 हजार पाकिस्तानी रुपये देऊन खरेदी केले असतील.