खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून झटका बसणार

क्रिकेटर्स मैदानावर जे पाणी पितात, त्या पाण्याच्या बॉटलची किंमत तुम्हाला माहिती आहे का? इतक्या रुपया तर तुमचा महिन्याचा किराणा येऊ शकतो, हो, हे खरं आहे. किती आहे या पाण्याच्या बॉटली किंमत?

खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून झटका बसणार
इतके महागडे पाणी?
| Updated on: Oct 24, 2025 | 4:40 PM

क्रिकेटच्या मैदानात खेळाडू त्यांच्या तंदुरुस्तीवर आणि कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत करतात. त्यासाठी ते डाएट आणि हायड्रेशनवर पण लक्ष देतात. पण काही क्रिकेटर्स जे पाणी पितात ते आलिशान वस्तूंपेक्षा कमी नसते हे तुम्हाला माहिती आहे का? अनेक जण परदेशी ब्रँडचे मिनरल वॉटर पिते. तर काही जण खास ब्लॅक वॉटर पितात. या पाण्याची किंमत ऐकून तुम्हाला झटका बसल्याशिवया राहणार नाही. या पाण्याचा बॉटलमध्ये तुमच्या महिन्याचा किराणा येऊ शकतो.

विराट कोहलीची पाण्याची बॉटल

प्रत्येक खेळाडू हा त्याचे आरोग्य टिकवण्यासाठी खास डाएट आणि ड्रिंक पितो. टीम इंडियाचा जबरदस्त खेळाडू विराट कोहली हा त्याचे फिटनेस रुटीन फॉलो करतो. तो Evian नावाचे मिनरल वॉटर पितो. हे पाणी फ्रेंचच्या आल्प्स या डोंगरदऱ्यातील आहे. त्याची किंमत जवळपास 3000 ते 4000 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तो अनेकदा ब्लॅक वॉटर पण पितो. यामध्ये नैसर्गिक खनिज आणि पीएच बँलेन्स्ड एलिमेंट्स असतात. हे पाणी शरिरारच आम्लता नियंत्रित ठेवते.

का महाग असते हे पाणी?

या आलिशान वॉटर ब्रँडच्या पाण्याची किंमत केवळ त्यांच्या नावामुळे महाग नाही. तर यामध्ये अनेक घटकद्रव्यामुळे ती वाढते. हा पाणी निर्माण करण्याची प्रक्रिया पण महत्त्वाची आहे. Evian हे पाणी पूर्णपणे नैसर्गिक प्रवाहातून मिळवल्या जाते. ते शुद्ध करण्यात येते. त्यात मिनरल्सामि इलेक्ट्रोलाईट्स संतुलित प्रमाणात मिसळतात. तर ब्लॅक वॉटरमध्ये एल्कलाईन असते. ते शरिरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.

कॅप्टन कूल कोणते पाणी पितो

काही खेळाडू जिथे पाण्यावर हजारो पैसे खर्च करतात. तिथे महेंद्र सिंह धोनी आजही साधारण पाण्यावर विश्वास ठेवतो. त्याला लक्झरियस ब्रँडची अजिबात क्रेझ नाही. तो 20 रुपयांची साधी पाण्याची बॉटल पितो. महागड्या ब्रँड्सचा वापर करणारे खेळाडू हे पाणी शरीरासाठी किती फायदेशीर आहे. ते शरिराला पोषक द्रव्य कसे पुरवतात याची माहिती देतात. न्युट्रिशन तज्ज्ञांच्या मते, जर पाणी शुद्ध आणि स्वच्छ आहे तर ब्रँड हे एक मिथक ठरते.