
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर आता दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. टेम्बा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या दोन्ही संघात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून कोणता संघ टीम इंडियाला अंतिम सामन्यात आव्हान देणार? याकडे लक्ष असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना बुधवारी 5 मार्च रोजी होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी सज्ज
One step closer to glory! 🏆🇿🇦🏏
Let’s rally behind the Proteas as they face New Zealand in the semi-final this Wednesday 🔥.
Catch all the action LIVE on Supersport 📺.#WozaNawe #BePartOfIt #ChampionsTrophy pic.twitter.com/g1yTHKnGwe
— Proteas Men (@ProteasMenCSA) March 3, 2025
दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, तबरेझ शम्सी आणि टोनी डी झोर्झी.
न्यूझीलंड टीम : मिशेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, जेकब डफी, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन आणि नॅथन स्मिथ.