
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्यावहिल्या सामन्यात अप्रतिम सुरुवात केली आहे. बेन डकेट याने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खणखणीत शतक झळकावलं आहे. बेन डकेट याने या शतकी खेळीसह माजी कर्णधार एंड्रयू फ्लिंटॉफच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. बेन डकेटने या शतकी खेळीत किती चौकार-षटकार ठोकले तसेच कोणत्या विक्रमाची बरोबरी केली? हे सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला झटपट 2 झटके दिले. फिलिप सॉल्ट याने 10 आणि जेमी स्मिथने 15 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडची 2 बाद 43 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर बेन डकेट आणि जो रुट याने दोघांनी सार्थपणे डाव सावरला आणि इंग्लंडला 200 पार पोहचवलं. मात्र त्यानंतर ही जोडी फुटली. जो रुट 78 बॉलमध्ये 4 फोरसह 68 रन्स करुन आऊट झाला.
त्यानंतर बेन डकेट याने हॅरी ब्रूकसह पुन्हा एकदा भागीदारी रचायला सुरुवात केली. डकेटने 32 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर फोर ठोकून शतक पूर्ण केलं. डकेटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. डकेटने यासह माजी कर्णधार एंड्रयू फ्लिंटॉफच्या 3 एकदिवसीय शतकांची बरोबरी केली.
डकेटने 95 बॉलमध्ये 106.32 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. डकेटने शतकी खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. डकेटने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 12 चेंडूत 50 धावा केल्या.
दरम्यान बेन डकेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत शतक करणारा इंग्लंडचा पहिला आणि एकूण सहावा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनुक्रमे टॉम लॅथम, विल यंग, तॉहिद हृदॉय,शुबमन गिल, रायन रिकेल्टन आणि बेन डकेट यांनी शतकी खेळी केली आहे.
डकेटचं चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणात शतक
Ben Duckett scores a magnificent century against Australia 🤩💯#ChampionsTrophy #AUSvENG ✍️: https://t.co/DBjsJNDgkY pic.twitter.com/nXSarbR8hN
— ICC (@ICC) February 22, 2025
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), एलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.