
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर बी ग्रुपमधून अजून सेमी फायनलसाठी चुरस पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला 26 फेब्रुवारीला 8 धावांनी पराभूत केलं. तर आता इंग्लंड या मोहिमेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 मार्च रोजी खेळणार आहे. तर टीम इंडिया 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध साखळी फेरीतील अंतिम सामना खेळणार आहे. याआधी क्रिकेट विश्वातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. स्पर्धेदरम्यान कर्णधाराने नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे.
जोस बटलर याने इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजनीमा दिला आहे. अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान बटरलच्या कॅप्टन्सीचा द एन्ड झाला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला बुधवारी पराभूत केलं. इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र अफगाणिस्तानने या रंगतदार झालेल्या सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. इंग्लंडचं अशाप्रकारे या पराभवासह आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. त्यानंतर जोस बटलर याने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय केला आहे.
दरम्यान इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेत साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडचा या सामन्यात विजय मिळवून मोहिमेतील शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यात यश मिळणार की दक्षिण आफ्रिका विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
जोस बटलरचा टी 20 आणि वनडे कर्णधारपदाचा राजीनामा
BREAKING: Jos Buttler has stood down as England white-ball captain, following his side’s Champions Trophy exit 🚨 pic.twitter.com/BQ5yiy4yTa
— Sky Sports Cricket (@SkyCricket) February 28, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंड टीम: फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद, टॉम बँटन, गस ऍटकिन्सन, रेहान अहमद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दक्षिण आफ्रिका टीम : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, तबरेझ शम्सी आणि कॉर्बिन बॉश.