World Cup 2023 Point Table मध्ये मोठा उलटफेर, पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला धक्का!
ICC Cricket World Cup 2023 - Points Table : वर्ल्ड कपमध्ये उलटफेरचा शिकार झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाची गाडी सुसाट सुटल्याचं दिसत आहे. आफ्रिका संघाने पाकिस्तानचा पराभव करत आपली जागा मजबूत केली. पण पाकिस्तानच्या पराभवाचा फटका भारताला बसला आहे.

मुंबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धा जवळपास आता अर्ध्यावर आली असून उर्वरित सामन्यात सेमी फायनलमधील मधील संघ निश्चित होतील. शुक्रवारी झालेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमधील अटीतटीच्या सामन्यामध्ये आफ्रिकेने विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने पॉईंट टेबलमध्ये गगनभरारी घेतली असून पाकिस्तान संघाच्या पराभवाचा भारताला मोठा फटका बसला आहे. आता सेमी फायनलमधील चार संघासाठीची चुरस आणखी वाढणार आहे.
पाकिस्तानच्या पराभवाने भारताला धक्का
पाकिस्तान संघाचा शुक्रवारी झालेल्या सामन्यात पराभव झाल्याने भारतीय संघाचं नुकसान झालं आहे. दक्षिण आफ्रिका संघाने या विजयासह पॉईंट टेबलमध्ये भरारी घेत अग्रस्थान पटकावलं आहे. यामुळे भारताची आता दुसऱ्या स्थानी घसरण झालीये. भारत आणि आफ्रिकेचे 10 असे समान गुण आहेत मात्र नेट रनरनेट जास्त असल्याने आफ्रिका अग्रस्थानी गेली आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर आफ्रिका एक नंबरला गेली नसती. आफ्रिकेने नेदरलँडविरूद्धचा सामना सोडला तर सर्व सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही.
| संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
|---|---|---|---|---|---|
| भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
| दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
| ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
| न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
| पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
| अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
| श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
| नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
| बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
| इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
शुक्रवारी झालेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यामध्ये सर्वबाद 270 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाकडून शकील 52 धावा आणि बाबर आझम 50 धावा यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाची दमछाक झालेली पाहायला मिळाली. शेवटपर्यंत गेलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव झाला. वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचं जवळपास पॅकअप झाल्यात जमा आहे.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी